सर्वांनी शिरखुर्म्यासह विविध पदार्थांचा घेतला आस्वाद
By MahaTimes ऑनलाइन | बीड
माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील पल्स हॉस्पिटलच्या वतीने सोमवारी ( दि.16) सायंकाळी आयोजित ‘ईद मिलाप’ कार्यक्रमात शहरातील मान्यवर डॉक्टर मंडळींनी हजेरी लावली. यावेळी सर्वांनी शिरखुर्म्यासह विविध पदार्थांचा आस्वाद घेतला.
पल्स हॉस्पिटल चे संचालक डॉ. तौसिफ शेख यांच्या सन्मित्र कॉलनी येथील निवास्थानी आयोजित ईद मिलाप कार्यक्रमात तालुका आरोग्य अधिकारी (टीएचओ) डॉ. मधुकर घुबडे, माजलगाव पंचायत समिती चे उपसभापती डॉ. वसीम मनसबदार, डॉ. श्रेयस देशपांडे, डॉ. विजय खळगे, डॉ. ज्ञानेश्वर गिलबिले, डॉ. यशवंत राजेभोसले, डॉ. सचीन डक, डॉ. युवराज कोल्हे, डॉ. अमोल परतुरकर, डॉ. अमर होरमाले, डॉ. ऋषीकेश थावरे, डॉ. जुजगर, डॉ. शोएब शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या ईद मिलाप कार्यक्रमात उपस्थित सर्वांचे शेख परिवाराच्यावतीने डॉ. तौसिफ शेख यांचे वडील जिला परिषद से सेवानिवृत्त आदर्श शिक्षक वासेफोद्दीन शेख, तकियोद्दीन शेख यांनी स्वागत केले. हा ईद मिलाप चा छोटेखानी कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.
गेली दोन वर्ष कोरोना महामारीच्या संकटामुळे डॉक्टरमंडळी आरोग्य सेवेत व्यस्त होती. मात्र सध्या स्थिती पूर्वपदावर आल्याने आरोग्य क्षेत्रातील वरिष्ठ व सहकारी मंडळींची भेट व्हावी. एकत्र वार्तालाप व्हावा म्हणून हा ईद मिलापचा कार्यक्रम आयोजित केला अशी प्रतिक्रिया पल्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. तौसिफ शेख यांनी ‘महाटाईम्स’शी बोलतांना व्यक्त केली.