14 व 15 मे रोजी सेमिनारचे आयोजन, देशभरातून 1500 प्रतिनिधी सहभागी होणार
By MahaTimes ऑनलाइन | औरंगाबाद
होमोओपॅथिक मेडिकल असोसिएशन ऑफ इंडिया या होमिओपॅथी च्या राष्ट्रीय संघटनेचे 22वे ऑल इंडिया होमिओपॅथीक सायंटिफिक सेमिनारचे 14 व 15 मे 2022 रोजी रुक्मिणी ऑडिटोरिम सिडको औरंगाबाद येथे आयोजित केल्याची माहिती या सेमिनारचे कोचेअरमन आमदार विक्रम काळे, ऑर्गनाईझींग कमिटीचे चेअरमन डॉ. अरुण भस्मे ऑर्गनाईझींग सेक्रेटरी डॉ. बाळासाहेब पवार व कोषाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या सेमिनारचे आयोजन होमिओपॅथी मेडिकल असोसिएशन ऑफ इंडियाची महाराष्ट्र शाखा, असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ प्रायव्हेट होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजेस बीड येथील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. केंद्रीय होमिओपॅथी परिषदेचे माजी अध्यक्ष तथा या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पटना येथील डॉ रामजी सिंग असून बडोदा येथील डॉ पियुष जोशी हे सेक्रेटरी जनरल आहेत तर कोलकता येथील डॉ सईलताफ हुसेन हे राष्ट्रीय डेप्युटी प्रेसिडंट यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या संघटनेच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ मुरलीधर ईढोळे, सेक्रेटरी डॉ दिलीप खडोदे,कोषाध्यक्ष डॉ राजेश गरीबे या संघटनेच्या महिला प्रकोष्टच्या प्रमुख डॉ. कांचन देसरडा व उपाध्यक्ष डॉ ज्ञानेश ढाकुलकर यांचे सहकार्य लाभणार आहे.
स्मरणिकेचे होणार विमोचन
यावेळी स्मरणिकेचे विमोचन करण्यात येणार असून यासाठी मान्यवरांचे संदेश,तज्ञांचे लेख,जाहिराती तज्ञांचे अनुभव प्राप्त झाले आहेत. दोन दिवस चालणाच्या या सेमिनार मध्ये देशभरातून 1500 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. Conquering Challenges: Homoeopathic Way या थीमवर आधारित सेमिनारमध्ये
- Management of Covid 19,
- Covid Nosode and its application,
- Role of Nosodes in Pandemic,
- Homoeopathy as prophylactic,
- Evidence based cases,
- Cancer and Homoeopathy.
- Role of Homoeopathy in Pandemic problems of: work from home, distant learning &
E-learning. - Telemedicine and Homoeopathy
या विषयावर Dr. Anil Khurana, Dr. Subhash Kaushik, Dr. Bhaskar, Dr. Subhash Singh, Dr. R.K.Manchanda, Dr. Eswara Das, Dr. S K Tiwari, Dr. S.M. Singh, Dr. B T Rudresh, Dr. Munir Ahmed, Dr. Ashok Kumar Pradhan, Dr. Abhijit Chatopadhyay, Dr. Rajesh Shah, Dr. Vishpala Parthasarthy, Dr. AK Das, Dr. Biplab Kundu, Dr. Shubhamoy Ghosh, Dr. Souraj Das, Dr. Jaswant Patil, Dr. Ajit Kulkarni, Dr. Hiralal Agrawal, Dr. Rajat Chettergee, Dr. Mahendra Gaushal, Dr. Hiralal Agrawal, Dr. Jatin Shah, Dr. Pravin kumar, Dr. Skal pita Paranjape, Dr. Anjali Upadhye Dr. Ambrish Vijaykar, Dr. Bajrang Bhosale, Dr. Santosh Mahanwar, Dr. Rupali Bhalerao, Dr. Amit Sahani, Dr. B.P.Shriwastav, Dr. Parth Roy, Dr. Ravi Singh, Dr. Yogesh Bhat, Dr. Niturkar, Dr. Nishant Shrivastav, Dr. Sakina Nooruddin, Dr. Kalpana Rakhunde, Dr. Chimanlal Rajpal, Dr. Ankita Gawaskar, Dr. Rohit Vatsan, Dr. JayPrakash Darakh या तज्ञाचे पेपर्स सादर होणार आहेत. रिसर्च पेपर्स निवडण्यासाठी पुणे येथील डॉ डी वाय पाटील होमिओपॅथीक कॉलेजचे प्राचार्य डॉ धर्मेंद्र शर्मा यांचे अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाचे उदघाटनासाठी केंद्रीय आयुष्य मंत्री मा सर्वानंद सोनोवाल,केंद्रीय वित्त राज्य मंत्री मा डॉ भागवत कराड, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा अमितजी देशमुख, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू, लेफ्ट जन (निवृत्त ) डॉ माधुरी कानिटकर, भारत सरकारच्या होमिओपॅथीच्या सल्लागार डॉ संगीत दुग्गल, राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाचे चेअरपर्सन डॉ अनिल खुराणा, आयोग अंतर्गत असलेल्या मेडिकल असेसमेंट व रॅटिंग बोर्डाचे प्रेसिडेंट डॉ जनार्धनन, एजुकेशन बोर्डाचे प्रेसिडेंट तथा आयोगाचे सेक्रेटरी डॉ तारकेश्वर जैन, रजिस्ट्रेशन बोर्डाचे प्रेसिडेंट डॉ पिनांकिन त्रिवेदी यांना निमंत्रित केले असून समारोप दि 15 मे रोजी होत आहे यासाठी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ भारती पवार, कैंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपादजी नाईक, राज्याचे आरोग्य मंत्री मा राजेशजी टोपे, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर प्रमोद येवले व आरोग्य विद्यापिठाचे कुलसचिव डॉ कालिदास चव्हाण, यांची उपस्थिती राहणार आहे.
या सेमिनारचे चीफ पॅट्रॉन म्हणून वडोदरा येथील पारूल विद्यापीठाचे प्रेसिडेंट डॉ देवांशु पटेल यांनी स्वीकृती दिली आहे. या सेमिनारच्या स्वागत कमिटीचे चेअरमन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर तर को चेअरमन मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार श्री विक्रम काळे यांनी जबाबदारी स्वीकारली आहे, आमदार सतीश चव्हाण, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, माजीआमदार सुभाष झाम्बड, माजी आमदार डॉ कल्याण काळे, माजी आमदार एम एम शेख, महात्मा गांधी मिशनचे कुलपती मा अंकुशराव कदम,उपाध्यक्ष डॉ पी एम जाधव यांचे हे सेमिनार सफल करण्यासाठी मार्गदर्शन लाभणार आहेत.
या सेमिनार साठी वेगवेगळ्या समित्यांचे गठन करण्यात येत आले असून,स्थानिक होमिओपॅथी महाविद्यालयाचे अध्यक्ष/ सेक्रेटरी, डॉ राजीव खेडकर, डॉ पी वाय कुलकर्णी, श्री द्वारकादास पारथ्रीकर, डॉ प्रकाश झाम्बड, डॉ कांचन देसरडा, ऍंड दिलीप खिंवसरा,श्री प्रशांत देसरडा, प्राचार्य सर्वश्री डॉ जतीन शाह, डॉ फुरकान आमेर, डॉ उमा कुलकर्णी, डॉ अनुपमा पाथ्रीकर,डॉ बाबाराव दुधमल, डॉ महेंद्र गौशाल, डॉ विजय दाभाडे, डॉ हंसराज वैद्य, डॉ स्मिता कामितकर हे प्रयनशील आहेत. 22nd All India Homoepathic, Sc tvientific Seminar, चे कार्यालय Shiva Trust Town Center, Sevan hill, Jalna Road – Aurangabad, Maharashtra येथे उघडण्यात आले आहे. या सेमिनार मध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.