By MahaTimes ऑनलाइन | बीड
बीड जिल्ह्यात 3 मे रोजी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अभाधित राहावी याअनुषंगाने बीड जिल्ह्यात पोलिस अधीक्षक पंकज देशमुख एक्शनमोड मध्ये आले आहेत. शांतता भंग करणाऱ्या समाजकंटकांनाजशाच तसे उत्तर देण्याची आम्ही तयारी केली असल्याचे पोलिसअधीक्षक देशमुख यांनी बोलताना मिडियाशी बोलताना सांगीतले आहे.
सध्या मस्जिदीवरील भोंग्यांवरून राज्यासह बीड जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. 3 मे पर्यंत भोंगे उतरले नाहीत तर आम्ही चार मेपासून दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू असा ईशारा तर थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलेला आहे.
रमजान ईदच्या पार्श्वभूमिवर बीड जिल्ह्यातशांतता आबाधीत रहावी, याकरिता पोलिस अधीक्षक पंकज देशमुखयांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. जिल्ह्यात 2474 पोलिस कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त ठेवला आहे. यामध्ये स्वत: सह, दोनअप्पर पोलिस अधीक्षक, पाच डीवायएसपी, 22 पोलिस निरीक्षक,55 सहाय्यक पोलिस निरीक्षक, 74 पोलिस उपनिरीक्षक, 1365 पोलिस कर्मचारी, आरसीपी जवान शंभर, एसआरपी जवान 200 आणि होमगार्ड 650 असा एकूण 2474 कर्मचाऱ्यांचा यामध्येसमावेश आहे.