नमाजचे वेळापत्रक : ईदगाहसह प्रमुख मस्जीदमध्ये नमाज अदा केली जाणार
By MahaTimes ऑनलाइन | बीड
आज (सोमवारी) चंद्रदर्शन झाल्याने रमजानचे तीस रोजे (उपवास) पूर्ण झाले असून उद्या (मंगळवारी) 3 मे रोजी ईद-उल-फित्र (रमजान ईद) साजरी केली जाणार आहे.
रविवारी रात्री शव्वाल चंद्रकोर चंद्र दिसला नाही, म्हणून 2 मे हा रमजान 2022 चा शेवटचा दिवस म्हणून पाळला गेला. यासह मुस्लिम बांधवांना रमजान चे तीस रोजे ठेवण्याची संधी भेटली. मंगळवारी 3 मे रोजी ईद-उल-फित्र साजरी केली जाईल.
ईद हा मुस्लिमांचा सर्वात मोठा सण आहे. पवित्र रमजान महिन्यानंतर हा सण शांतता आणि बंधुभावाचा संदेश घेऊन येतो. ईदच्या दिवशी खास वेळापत्रकअदा केली जाते, नवीन कपडे परिधान केले जातात. प्रत्येक घरोघरी सिरखुर्मा व मिष्ठान्न बनविले जाते. यादिवशी शांती आणि सद्भावानेसाठी प्रार्थना केली जाते.
तब्बल दोन वर्षानंतर बाजारपेठेत रमजान ईद यंदा उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र महागाईने यंदा उच्चांक मांडला असुन याचा परिणाम बाजारपेठामध्ये ग्राहकांचा अपेक्षानुरूप प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शहरातील मीना बाजारसह अन्य प्रमुख बाजारपेठात ही दिवसभर कडक उन्हाळा असल्याने रात्रि ग्राहक खरीदीसाठी येत आहेत. सोमवारी शेवटच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत बाजारपेठा सुुरू राहणार आहेत. दरम्यान जिल्हाभरात उद्या मंगळवारी ईदगाहसह प्रमुख मस्जीदमध्ये ईदची नमाज अदा केली जाणार आहे.
रमजान ईद चे वेळापत्रक
बालेपीर नवीन ईदगाह -9.00
इस्लामपुरा जुनी ईदगाह -9.30
तकिया मस्जीद -8.15
मरकज मस्जीद राजुरी वेस -8.30
मदरसा दारु ल उलूम बीड-9.00
बालेपीर दरगाह मस्जीद -9.30
एक मीनार मस्जीद बालेपिर-10.00
केजीएन मस्जीद शहेंशाह नगर-9.15
कारंजा मस्जीद-8.00
जामा मस्जीद किल्ला मैदान -8.30
कुरैशी मस्जीद मोमिनपुरा -8.00
मदिना मस्जीद मोमिनपुरा -8.30
जकेरिया मस्जीद मिल्लत नगर-9.00
काली मस्जीद, इस्लामपुरा -9.45
बीड बारादरी मस्जीद, इस्लामपुरा -9.00
बीबी फातेमा मस्जीद तेलगांव नाका- 8.30
ह. शहेंशाहवली दर्गाह मस्जीद बीड-9.00
चंदामा मस्जीद मोमीनपुरा बायपास-9.30