पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या हस्ते कीट चे वाटप
अशा सर्वधर्मिय हिताच्या कार्यक्रमाची गरज -एसपी श्री. लांजेवार
By MahaTimes ऑनलाइन | बीड
मैं किसी से बेहतर करूं क्या फर्क पड़ता है. मैं किसी का बेहतर करूं बहुत कुछ फर्क पड़ता है. या धर्तीवर कोणताही तामझाम न करता ऑल महाराष्ट्र के.जी.एन. ग्रुपच्या वतीने संस्थापक अध्यक्ष तथा समाजसेवक सय्यद ज़हीर अली शाह कादरी यांनी सामाजिक बांधिलकी या नात्याने दोन हजारांवर गरजवंतांना पवित्र रमजान ईद निमित्त किराणा कीट चे वाटप केले. हा कीट वाटपाचा कार्यक्रम शुक्रवारी प्र. पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या हस्ते पार पडला.
जहीर अली कादरी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या कार्यक्रमात शहरातील 2022 गरजवंतांना कीट चे वाटप करण्यात आले. मुस्लिम समुदायातील गोर, गरिबांसोबत इतर धर्मीय गरजवंताना ही यावेळी पोलिस अधीक्षक श्री. लांजेवार, पोलिस निरीक्षक श्री. रवी सानप यांच्या हस्ते कीट चे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शहर ठाणे निरीक्षक रवी सानप, पत्रकार सिराज आरजू, रफीक पठाण यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलतांना एसपी सुनील लांजेवार म्हणाले की, केजीएन ग्रुप चे प्रमुख जहीर अली कादरी ईदच्यानिमित्त सर्वधर्मीय बांधवांची ईद गोड करण्यासाठी केलेला हा प्रयत्न आदर्श घेण्यासारखा आहे. सामाजिक सलोखा वृध्दींगत करण्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. अशा उपक्रमाची आज नितांत गरज आहे.
कादरी यांची अखंडीत समाजसेवा
सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेले जहीर अली शाह कादरी गेली अनेक वर्षांपासुन केजीएन ग्रुप च्या माध्यमातुन पवित्र रमजान ईद च्या पार्श्वभूमिवर किराणा कीट वाटपाचा उपक्रम राबवित आहेत. याशिवाय कादरी वर्षभर रक्तदान, वृक्षारोपण, रूग्णांना फळ पाटप, अॅम्बुलन्स द्वारे रूग्ण सेवा करीत आहेत. केजीएन ग्रुप ही संस्था राज्यस्तरावर कार्यरत असून पदाधिकारी, कार्यकर्ते सामाजिक उपक्रमासह समाजात जातीय सलोखा अबाधित रहावा यासाठी प्रयत्नरत असतात.
कोरोना संक्रमण काळात सुसज्ज अॅम्बुलन्स चे जिल्हा शल्यचिकीत्सकांच्या हस्ते लोकार्पण, लॉकडाउन दरम्यान अडचणीत आलेल्या सर्व समाजबांधवांना किराणा कीटचे वाटप करण्यात आले होते. केजीएन ग्रुप ने कोरोना संक्रमण थोपविण्यासाठी विविध जनजागृती उपक्रम राबविले.