By MahaTimes ऑनलाइन – बीड |
जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून विविध सण व उत्सवांच्या अनुषंगाने शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू केला आहे,
बीड शहर भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या 37 (1)(3) कलमान्वये जिल्ह्याच्या शहरी हद्दीत सदर आदेश 27 एप्रिल रात्री 12 वाजेपासून ते 10 मे 2022 रोजी रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीपर्यंत लागू करण्यात आले आहेत.
असे अपर जिल्हादंडाधिकारी संतोष राऊत बीड शहर यांनी कळविले आहे.