By MahaTimes ऑनलाइन – बीड |
येथील सौै.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभागाचा 19 वा नाट्य महोत्सव बालनाट्य,अभिवाचन,एकांकिका आणि नाटकाने गाजला या महोत्सवाचे उद्घाटण बीड नाट्य परिषदेच्या अध्यक्ष डॉ.दीपा क्षीरसागर यांच्या हस्ते नटराज पूजन करून करण्यात आले. वैविध्य पूर्ण असा हा आगळावेगळा नाट्यमहोत्सव ज्यामध्ये बालनाट्य,अभिवाचन,एकांकिका,नाटक या सर्व अंगाना स्पर्श करणारा परिपूर्ण महोत्सव असल्याचे मत डॉ.दीपाताई क्षीरसागर यांनी व्यकत केले. महोत्सवातील सातत्य टिकवत नाटयशास्त्र विभाग पंचेवीसाव्या वर्षाकडे वाटचाल करत आहे. येणार्या रोप्य महोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा देत सर्व कलावंताना आशिर्वाद देत त्यांनी महोत्सवाचे उदघाटन केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर,नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.संजय पाटील देवळाणकर आणि पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ.सतिष माऊलगे,डॉ.दुष्यंता रामटेके, प्रा.विजय राख उपस्थीत होते. दोन दिवस चाललेल्या या नाट्य महोत्सवात ठोंब्या ठोबीं ची गोष्ट हे बालनाट्य, तीची शेवटची भेट या नाटकाचे अभिवाचन,नेकी ही एकांकिका तर वानरायण हे नाटक सादर करण्यात आले.मागील 23 वर्षात आठरा नाट्य महोत्सव झाले असून या वर्षी एकोणविसावा नाट्य महोत्सव संपन्न झाला.
वानरायण या नाटकात आजच्या समाज व्यवस्थेवर आणि परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. वानर माणसाच्या रूपात येतात व भौतिक परिस्थितीशी समरस होतात आणि पुन्हा वानर रूपात जाणयास नकार देतात पण त्यांना मानव स्वीकारत नाही व वानर पण स्वीकारत नाही. अशा परिस्थितीशी त्यांना सामना करावा लागतो. एकूण काय तर आपला जन्म ज्या युनित होतो तिथेच राहणे योग्य असते असा संदेश देण्याचा प्रयत्न या नाटकातून झाला आहे. स्वप्नील गांगुर्डे लिखीत या नाटकाचे दिग्दर्शन लक्ष्मीकांत दोडके व रोहीत ताराहार यांनी केले होते.
नेपथ्य अमित गाडे, देवा रहे, संगीत पवन शिंदे, विजय कोर्डे, विष्णू राठोड,प्रकाश योजना अक्षय फुलझळके, रंगभूषा देवी प्रसाद, सोहनी, वेशभूषा प्रतिक्षा दहिफळे यांना तांत्रिक बाजू सांभाळल्या यातील कलावंत रोहीत ताराहार, देवा दहे, पलवी दहिफळे, अंकुर तांगडे, प्रा.प्रविण मांजरे, रोहित पुराणीक,सुमीत गायकवाड, निलेश लोंढे, पुजा तांबारे, अभिषेक दळवी, शिवाजी साळूंके, राजेश लोंढे, सुधाकर बहिरवाळ, अनुष्का बुरगुटे, लक्ष्मीकांत दोडके, श्रेया कुलकर्णी, प्रतिक्षा दहिफळे, आर्या दोडके, परमेशवर पांडूळे, महेश आंदुरे, अभय मोटे, श्वेता गणगे हे होते.
दुसर्या दिवशी इरफान मुजावर लिखीत आणि संतोष पैठणे व अंकुर तांगडे दिग्दर्शीत नेकी ही एकांकिका झाली. दहशतवाद,आंतकवाद यांच्यात मुस्लीम महिलांची जी फरफट होते याचे जिवंत उदाहरण यात दाखवले आहे.आपल्या स्वार्थासाठी महिलांचा वापर करणे,त्यांचा व्यापार करणे, विरोध केल्यास मारहाण करणे हे चालू असतानाच स्त्रीया -स्त्रीयां विषयी चांगला विचार करतात व एकांकिकेची मदत करत सुटका करतात असा सकारात्मक संदेश देण्याचा अनुभव या नाटकातून येतो.
पल्लवी कुलकर्णी,अंकुर तांगडे व अनुष्का बुरगुटे या तीन अभिनेत्रीनी अतिशय कसदार अभिनय यात केला आहे. शिवाय शिवाजी सांळूके,सुमित गायकवाड,राजेश लोंढे यांनी देखील भूमिका केली आहे. नेपथ्य -पल्लवी दहिफळे,अमित गाडे, संगीत- रोहित ताराहार, रंगभूषा -उर्मिला लोटके, हेमंत बडवे यांनी तांत्रिक बाजू सांभाळल्या. प्रा. विजय राख लिखीत व अजित चव्हाण लिखीत तिची शेवटची भेट या नाटकाचे नाटय अभिवाचन करण्यात आले. शाळा कॉलेजात एकत्र शिकणारे ग्रामीण भागातील एक प्रेमीयुगुल यात दाखवण्यात आले आहे. आठवणींचे सात प्रसंग सांगताना तो काही प्रसंगात आनंदी होतो तर काही प्रसंगात दुःखी होत येणार्या परिस्थितीशी लढत राहणे व पुढे चालत राहणे यावर अतिशय मार्मीक पध्दतीने भाष्य करणार्या या नाट्य अभिवाचनाचा अस्वाद प्रेक्षकांनी घेतला यात पल्लवी दहिफळे, अजित चव्हाण, अभिषेक दळवी व निलेश लोंढे यांनी भूमिका केल्या. संगीत-रोहित ताराहार, तर प्रकाश योजना- सुमित गायकवाड यांची होती.
महोत्सवाची सांगता धनंजय सरदेशपांडे व लक्ष्मीकांत दोडके दिग्दर्शीत ठोंब्या ठोंबीची गोष्ट या बालनाट्याने झाली. या बालनाट्यात लहान मुलांच्या विश्वात ज्या गोष्टी कधीही दिसत नाही. अदभूत,रम्य, भितीदायक, उत्साहवर्धक वातावरण तयार करून बाल प्रेक्षकांना गंमत वाटेल आणि ते प्रेक्षक त्या रम्य कथेकडे आकर्षीत होतील असे प्रयत्न यात करण्यात आले. चेटकीन, सावल्या आग्या वेताळ, महासंमंध,मुंजोबा,जोकर, ठोंब्या ठोंबीची झोंबा झोंबी हे सगळे गाणे, कविता यांच्या माध्यमातून दाखवण्यात आले. यात श्रृुजना देवगीरे, शाल्वी मुळूक, राज काळकुटे, प्राची थोरात,जान्हवी बोराडे, अपूर्वा पिंगळे, समर्थ राऊत, सार्थक क्षीरसागर सुरभी निराळे, स्नेहल मुळे, श्रेया शहाणे, प्रत्येंचा काळे, समृध्दी क्षीरसागर, आर्या जाधव, स्नेह काटकर, निधी दोडके, सई दोडके या बालकलावंतानी भूमिका केल्या तर रोहीत ताराहार, अक्षय फुलझळके, रविंद्र हातागळे, अमित गाडे यांनी तांत्रीक बाजू सांभाळल्या.
दोन दिवस चाललेल्या या महोत्सवासाठी उपप्राचार्य एल.एन.सय्यद, पर्यवेक्षक जालींदर कोळेकर, डॉ.दुष्यंता रामटेके, प्रा.विजय राख, प्रा.दिपक जमधाडे,प्रा.सुरेश थोरात तसेच नाटयशास्त्र पदवीकाव प्रमाणपत्र कोर्सचे विद्यार्थी तसेच बी.ए.नाटयशास्त्र विषयांचे विद्यार्थी आदिनी परिश्रम घेतले होते.