खा.शरद पवारांसह, आजी-माजी मंत्री, दिग्गज मंडळींची उपस्थिती
अक्षदा आणि स्वागत समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला
By MahaTimes ऑनलाइन – पुणे |
जेष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांची नात व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मा.आ. अमरसिंह पंडित यांची कन्या डॉ. पद्मांजली हिचा शुभविवाह सनदी अधिकारी गोविंदराव बोडके यांचे चिरंजीव मयुरेश याच्या सोबत रविवारी सकाळी 9.45 च्या शुभमुहूर्तावर विधीवत पद्धतीने पुणे येथे वेस्ट इन या हॉटेलमध्ये संपन्न झाला. या शुभ प्रसंगी नवदांपत्यास शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्यासह सर्वच क्षेत्रातील दिग्गज मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
अक्षदा आणि स्वागत समारंभ
पुणे येथील लक्ष्मी लॉन्सवर सायंकाळी सात वाजता झालेल्या अक्षदा आणि स्वागत समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला. या शुभप्रसंगी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, गृहमंत्री ना दिलीपराव वळसे पाटील, ना धनंजय मुंडे, खा. रावसाहेब दानवे, माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सह मंत्री, आजी-माजी आमदार, प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दिग्गजांचे शुभआशिर्वाद लाभले
यावेळी वधूवरांना शुभआशिर्वाद देण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, राजेश टोपे, ना. धनंजय मुंडे, ना. दत्ता भरणे, ना. नरहरी झरिवाड, खा. रजनीताई पाटील, का. प्रताप पाटील चिखलीकर, आ. प्रकाश सोळंके, आ. विक्रम काळे, आ. बाळासाहेब आजबे, राहुल पाटील, निरंजन डावखरे, आ. विनायक मेटे, रविंद्र फाटक, श्यामसुंदर शिंदे, दिलीपराव देशमुख, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विश्वास जाधव, न्यायमूर्ती साधना जाधव, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त रामनाथ पोकळे यांच्यासह राजकीय, सामाजिक, धार्मिक, प्रशासकीय, पत्रकारिता आदि क्षेत्रातील मान्यवर मंडळीसह बीड जिल्हा आणि महाराष्ट्रातील आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आवर्जून उपस्थिती लावली. दरम्यान पंडित, बोडके परिवारांकडून शुभविवाह प्रसंगी उपस्थित मान्यवर मंडळींचे स्वागत करण्यात आले.