भाजपच्या वतीने खा.प्रितमताईंचे जोरदार स्वागत
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
तत्कालीन पालकमंत्री पंकजाताईंनी मंजुरी मिळवून निधी दिलेल्या जिल्हा परिषदेच्या टोलेजंग इमारतीत खा.प्रितमताई मुंडे सोमवारी पहिल्यांदाच आल्या. यावेळी भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी भाजपच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. जिल्ह्याच्या विकासासाठी पंकजाताईंसह खा. प्रितमताईंनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केलेला असून मिनी मंत्रालयाची इमारत उभारून जिल्ह्याच्या वैभवात भर घातल्याचे भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी सांगितले.
बीड जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीत खा. डॉ.प्रितम मुंडे यांचे भाजपच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. खा.प्रितमताई दाखल होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. झेडपीच्या प्रवेशद्वारापासुनच खा.प्रितमताईंना ढोल – ताशांच्या गजरात वाजत-गाजत मुख्य गेटपर्यंत नेण्यात आले. यावेळी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे जोरदार जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्यासह जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के, प्रा. देविदास नागरगोजे, सलीम जहाँगीर ,स्वप्निल गलधर, भगीरथ बियाणी, संतोष हांगे, सुनील मिसाळ, अशोक लोढा , विक्रांत हजारी, हाजी जे. डी. शाह, भारत काळे, अजय सवाई, सविताताई गोल्हार, जगदीश गुरखुदे, चंद्रकात फड, गणेश पुजारी, मुरलीधर ढाकणे, संग्राम बांगर, विलास बामणे, दत्ता परळकर, इर्शाद शेख, भूषण पवार, विवेक पाखरे, दीपक थोरात, गणेश बहिरवाल, डॉ लक्ष्मण जाधव, अनिल चांदणे, भगवान केदार, विष्णू घुले, लताताई मस्के, छायाताई मिसाळ, संगीताताई धसे, संतोष राख, डॉ .अभय वणवे, संजिवनी राऊत, प्रीती कुकडेजा, जालिंदर मिसाळ, महादेव नागरगोजे, नागेश पवार, हरीश खाडे यांच्यासह भाजपचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.