गेवराई तालुक्यातील राजापूर येथे घडली घटना
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील दोन तरूणांचा गोदापात्रात बुडुन मृत्यू झाल्याची घटना राजापूर येथे घडली. जोतीबाची यात्रामुळे गावातील नागरीक व तरुण युवक कावड घेवून पाणी आणण्यासाठी तालुक्यातील राजापूर येथील गोदावरीच्या घाटावर शुक्रवार (ता. 15) एप्रिल रोजी गेले होते. तब्बल बारा तासांच्या शोध मोहिमेनंतर दोघांचेही मृतदेह आज सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान सापडले. मोहन नाना आतकरे व शिवाजी ज्ञानदेव इंगोले अशी मृतांची नावे आहेत.
गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका या ठिकाणी प्रतिवर्षी जोतीबाची यात्रा गावांत भरत असते. तालुक्यातील निपाणी जवळका येथील मोहन नाना आतकरे (वय 18 रा. निपाणी जवळका ) शिवाजी गिन्यानदेव इंगोले (वय 18, मूळचा राहणार बेडकोचीवाडी ) सद्या तो निपाणी जवळका येथे मामाकडे राहत होता.
गावांत जोतीबाची यात्रा महोत्सव असल्याने गावातील नागरीक हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी हनुमान व जोतिबा देवाला अभिषेक घालण्यासाठी गोदावरी नदीचे पाणी परंपरेनुसार आणत असतात. यावर्षी गावातील नागरीक व तरुण युवक कावड घेवून पाणी आणण्यासाठी तालुक्यातील राजापूर येथील गोदावरीच्या घाटावर शुक्रवार (ता. 15) एप्रिल रोजी गेले होते. मात्र, पाणी घेऊन परत येताना मोहन आतकरे आणि ज्ञानदेव इंगोले सोबत नसल्याचे इतर युवकांच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती लागलीच ग्रामस्थांना दिली.
यातील मोहन आतकरे व शिवाजी इंगोले हे पाणी घेण्यासाठी गेले असता त्यांचा पाण्यात तोल जावून बुडाले. शनिवार (ता. 16) एप्रिल रोजी सकाळी त्यांचा शोध घेतला असता ते मृत अवस्थेत पाण्यात आढळून आले.
गावकरी यांच्या मध्यस्थिने दोन्ही मृत्यूदेह गोदापात्राच्या बाहेर काढण्यात आले असुन उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही मयताला तलवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आनले आहे. सदरील घटनेने निपाणी जवळका येथे शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.