जिल्हाप्रमुख अनिल जगताप व युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिले निवेदन
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
शहरात आणि ग्रामीण भागात सध्या मोठ्या प्रमाणावर लोडशेडिंग सुरू आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण असून ही लोडशेडींग बंद करण्यात यावी यासाठी शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख अनिल जगताप व युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले.
कोरोना-19 च्या दोन वर्षांच्या काळात कडकडीत लॉकडाऊन ने सर्व लोकांचे व्यवसाय बंद होते. आता कुठे हे सर्व निर्बंध हटवले असून लोक आपआपले काम, छोट मोठे व्यवसाय सुरू करून पोट भरायला लागले होते. परंतु एम.एस.ई.बी. (Mahavitaran) विभागामार्फत मागच्या काही दिवसांपासून बीड शहरात सक्तीची लोडशेडींग सुरु केली आहे. त्यामुळे लोकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.
ग्रामीण भागात मागील काळात अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यातून शेतकरी वर्ग सावरण्याचा प्रयत्न करू लागला आहे. पाऊस जास्त प्रमाणात झाल्यामुळे शेतकर्यांच्या विहीर, बोअरवेल ला भरपूर पाणी असल्याने शेतकरी थोडे फार बागायती शेती करून जगत होता. परंतु एम.एस.ई.बी.च्या सततच्या लोडशेडिंगमुळे शेतकर्यांचे उभे पीक वाळण्याच्या मार्गावर आहे.
तसेच दि.03 एप्रिल पासून मुस्लिम धर्मीयांचा पवित्र रमजान (Ramzan) महिना सुरू झाला आहे. त्यांना इफ्तार, सहेर, तराविह नमाज पठण करण्यासाठी लोडशेडिंगचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. तसेच 10 एप्रिल ला श्रीराम नवमी (Shri Ram Navmi), 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jotiba Phule) जयंती, 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr.BabaSaheb Ambedkar) यांची जयंती, 16 एप्रिल रोजी हनुमान जयंती (Hanuman Jayanti) असल्यामुळे सर्व समाज बांधव उत्सव साजरा करतात. एम.एस.ई.बी. (M.S.E.B) च्या लोडशेडिंग मुळे सण उत्सव उद्योग, व्यापारी, शेतकरी व मजूर यांना अडचण निर्माण होत आहे.
एम.एस.ई.बी.ने सुरू केलेली लोडशेडिंग (Load-Shedding) बंद करून शहराची व ग्रामीण भागाची अडचण दूर करावी. उन्हामुळे नागरिकांना लोडशेडींगचा त्रास होत आहे. सर्वसामान्य नागरिकांची यामुळे हेळसांड होत असुन याबद्दल शनिवारी शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख अनिल जगताप व युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सर्व सहकार्यांसह अधिक्षक अभियंता यांना अधिक्षक कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले.
यावेळी जि.प.सदस्य गंगाधर घुमरे, गणपत डोईफोडे, अॅड.राजेंद्र राऊत, विनोद मुळूक, अमर नाईकवाडे, फारुख पटेल, गणेश वाघमारे, अॅड.विकास जोगदंड, बाळासाहेब गुंजाळ, इकबाल शेख, मुखीद लाला, शुभम धुत, रणजित बन्सोडे, प्रभाकर पोपळे, जलील खान पठाण, सचिन घोडके, अरुण बोंगाणे, नवनाथ घोडके, गोरख धन्ने, अंकुश राठोड, देवराव घोडके, विष्णू पवार, रामनाथ काकडे, रितेश लांडे, संदिप डावकर, नारायण माने, धनंजय वाघमारे, अमर विद्यागर, प्रमोद शिंदे, सनी वाघमारे, ईश्वर धन्वे, नवनाथ शिंदे, अॅड.नागेश तांबारे, किरण बेद्रे, रमेश वाघमारे, सिद्धु सुस्कर, आमेर सिद्दिकी, विक्रम चव्हाण, शहेबाज शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.