एआयएमआयएम चा महावितरण कंपनी व उर्जा मंत्र्यांना कडक इशारा
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
सध्या इस्लाम धर्माच्या सर्वात पवित्र रमज़ान महिन्याचे रोज़े सुरू आहे तसेच येणाऱ्या काही दिवसात वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या येणार आहेत. शिवाय सूर्य आग ओकत आहे. दररोज तापमान ४० अंश सेल्सिअस च्या वर आहे. असे असतानाही राज्यात शासनाने व महावितरण कंपनीने मिळून लोडशेडिंग करण्याचा उपटसुंभ निर्णय घेऊन उन्हाच्या उकाड्याने हैराण झालेल्या जनतेचा अंत पाहण्यात कोणतीही कसर ठेवली नाही.
यामुळे एआयएमआयएम जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ यांनी रोज़ा असूनही अन्य रोज़ेदार पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह रखरखत्या उन्हात महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करत कार्यकारी अभियंत्यांना कंदील भेट देवून निषेध नोंदवत जर रमज़ान महिन्यात लोडशेडिंग मागे घेण्यात आली नाही तर एआयएमआयएम पक्ष राज्यभरात तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही दिला आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, महावितरण कंपनी कडून नुकतीच लोडशेडिंग सुरू करण्यात आली आहे. विज निर्मिती साठी लागणारा कोळसा व पाणी राज्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध असतानाही महावितरण कंपनी ने लोडशेडिंग सुरू केली आहे. यामुळे राज्यभरातील जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. सध्या इस्लाम धर्माचा सर्वात पवित्र महिना रमज़ान सुरू आहे. या महिन्यात पहाटेपासून दिवस मावळेपर्यंत मुस्लिम बांधव दररोज़ जवळपास तेरा तासांचा रोज़ा धरत आहे. यामध्ये अन्नपाणी ग्रहण करणे वज्र असते. अशा अवस्थेमध्ये रोजेदारांना पंखे आणि कुलर ची नितांत आवश्यकता असते.
अशावेळी लोडशेडिंग सुरू केल्याने या साहित्यांचा वापर करता येत नाहीये. यामुळे रोजेदारांच्या जिवाची लाहीलाही होत आहे. तसेच इतर धर्मीय हिंदू बांधवांचे सुद्धा या काळात अनेक सण व महापुरुषांच्या जयंत्या येत आहे. याकरिता सुद्धा विजेची आवश्यकता असते. म्हणून रमज़ान ईद होईपर्यंत राज्यात लोडशेडिंग करू नये. अन्यथा सर्व धर्मियांच्या वरील बाबी लक्षात घेता लोडशेडिंग विरोधात एआयएमआयएम पक्षाकडून राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
असा इशारा एआयएमआयएम बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ यांनी महावितरण चे कार्यकारी अभियंता व त्यांच्या माध्यमातून राज्याच्या ऊर्जामंत्री यांना पाठवलेल्या निवेदनातून दिला असून निवेदन देताना काही काळ शफ़ीक भाऊ यांनी पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करत कार्यकारी अभियंता यांना कंदील भेट देवून निषेध नोंदवत जर रमज़ान महिन्यात लोडशेडिंग मागे घेण्यात आली नाही तर एआयएमआयएम पक्ष राज्यभरात तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही दिला आहे.
यावेळी अॅड. शेख शफीक भाऊ यांच्यासह शहर अध्यक्ष शिवाजी भोसकर, जिल्हा सचिव हाजी अय्युब खान पठाण, युवक जिल्हा अध्यक्ष शेख मतीन, युवक शहराध्यक्ष सलमान शेख, तालुका उपाध्यक्ष साजन चौधरी, जानी भाई, लियाकत भाई, शहर उपाध्यक्ष शेख शाकेर, फारुख खान, एजाज़ खान, नगरसेवक अज़हर मोमीन, ईम्रान खान, निहाल शेख, बासेद भाई, नवाब शिकलकर, जिल्हा सह सचिव शेख अन्वर पाशा, ज्येष्ठ नेते अब्दुस् सलाम सेठ, नईम मेम्बर, सय्यद सैफ़अली उर्फ़ लालू भैय्या यांची प्रमुख उपस्थिती होती.
टिप्स आणि ट्रिक्ससाठी खालील वेबसाइटला भेट द्या
www.thetechnotips.com