जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर- कुंडलिक खांडे
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
शिवसेनापक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब यांनी सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत विकासाचा यज्ञ सुरुच ठेवला आहे. मुख्यमंत्री साहेबांचे बीड जिल्ह्यावर विशेष लक्ष असून त्यांच्या माध्यमातून बीड विधानसभा मतदारसंघात जास्तीत जास्त विकास कामे खेचून आणण्यासाठी आपण प्रयत्नशिल आहोत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत अनेक नव्या रस्त्यांना मंजुरी मिळालेली आहे तसेच तालुक्यातील रस्त्याच्या डांबरीकरणाचा अनुशेष लवकरात लवकर भरून निघणार आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे मा.जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी केले. श्री.खांडे हे राज्य महामार्ग ते नागापुर खु. या रस्त्याच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
गुढी पाडव्याच्या शुभमुहुर्तावर म्हणजे शनिवार दि.2 एप्रिल रोजी शिवसेनेचे मा.जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागापुर मध्ये ग्राम सडक योजने अंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक जयसिंग मामा चुंगडे,तालूकाप्रमुख गोरख सिंघन , सरपंच मसुराम साळुंके, चेअरमन विष्णू साळुंके, अर्जुन साळुंके, अनंत साळुंके,राहुल साळुंके,विठ्ठल साळुंके, महेश साळुंके,जालिंदर साळुंके, दत्ता साळुंके,नारायण साळुंके, अजय साळुंके, मन्नू तात्या, खाजाभाई पठाण यांची उपस्थिती होती.
शुभारंभ प्रसंगी बोलतांना कुंडलिक खांडे म्हणाले की,
राज्यातील न जोडलेल्या वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी (प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर होऊ न शकणार्या वाड्या वस्त्या जोडण्यासाठी ) व सध्या अस्तित्वात असलेल्या परंतु दुरावस्था झालेल्या रस्त्यांच्या दर्जा वाढीसाठी राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत आहेत. राज्य मार्ग ते नागपुर खु. हे 80 लाख रु.चे असून या कामाचा शुभारंभ होत असताना आपणास आनंद होत आहे. आपल्या भागातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कायमच पुढाकार घेतलेला आहे. आज या ठिकाणी होत असलेल्या रस्त्याच्या कामामुळे नागपुर पंचक्रोशीतील ग्रामस्थांना आणि वाहन धारकांना मोठा फायदा होणार आहे.
या भागातील वाहन धारकांची प्रलंबित मागणी या निमित्ताने पूर्ण होणार आहे. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी मंजुर करून घेण्यात आपल्याला यश आले आहे. तालुक्यातील विकास कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील. शिवसैनिकांनी विकास कामे दर्जेदार होण्यासाठी लक्ष देण्याची गरज आहे. सर्वांनी एकदिलाने पक्ष संघटन वाढवून येणार्या काळात बीड विधानसभा मतदार संघात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकात शिवसेनेचा भगवा झेंडा फडकावावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच यावेळी मन्मथ साळुंके,मुसा पठाण, विठ्ठल शंकर साळुंके, इम्रान पठाण, बाळकृष्ण साळुंके, विक्रम साळुंके, बिभीषण जवंजाळ, दत्ता जगताप, सुरेश जवंजाळ, सय्यद निजाम, समाधान घोडके, महारुद्र साळुंके,ऋषीकेश साळुंके,भरत साळुंके, युवराज साळुंके, गोरख खेत्रे, मोहन साळुंके, किसन साळुंके, नामदेव साळुंके, आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.