व्हीलचेअर वर सवार होत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत गोल्ड, सिल्वर व ब्रॉंझ मेडल पटकावले
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
वयाच्या 17 व्या वर्षी नशीबी अपंगत्व आलेल्या आणि 85 टक्के शरीर पैरालाइसिस झाल्याने 5 वर्ष बेडवर राहिलेल्या कोमल बोरा ने आपल्या अंगी असलेल्या जिद्द व उदंड ईच्छाशक्तीबळावर जे स्थान प्राप्त केले ते पाहुन बीड जिल्हावासीयांचा उर अभिमानाने भरून येतो. आई-वडीलांसह पतीची साथ तिची हिम्मत तुटू दिली नाही. व्हीलचेअर वर सवार होत तिने बॅडमिंटनमध्ये मैदान गाजवत सुवर्ण, रौप्य पदकांची कमाई केली. आता तिने नुकतेच जोधपूरमध्ये पॅराग्लाइडिंग चे आव्हान स्वीकारून ते यशस्वी पूर्ण करीत जग जिंकणे शक्य आहे, अंगी हिम्मत असू दे असा संदेश दिला.
बीड शहरातील रहिवाशी असलेल्या कोमल बोराच्या जीवनात सर्वकाही ठीक चालले होते. अभ्यासाबरोबरच खेळात हुशार असल्याने ती आपल्या भविष्याविषयी स्वप्न रंगवित होती. मात्र 2006 मध्ये वयाच्या 17 व्या वषी एका रस्ते अपघाताने तिचे संपूर्ण जगच बदलून टाकले. अपघातात ती गंभीर जखमी होउन तिला 85 टक्के अपंगत्व आले. ती आपल्या आयुष्याची 5 वर्ष अंथरुणावरुन पडून राहिली. कोमल साठी हे पाच वर्ष सर्वात कठीन होते. ती कित्येक वेळेस निराश झाली. मात्र कुटुंबियांनी तिचे धैर्य तुटू दिले नाही. आई-वडील व भावंडांनी तिला नेहमी प्रेरणा देत असत. जीवनातला एक एक क्षण डोंगरा एवढा भासत होता.
आपले मन लागावे जीवनातील कटू अनुभवाचा विसर पडावा म्हणून तिने दुर्घटनेच्या सात वर्षांनंतर काहीं तरी करण्याची मनाशी निश्चय केला आणि व्हील चेअरवर बॅडमिंटन खेळण्यास सुरूवात केली. कांही महिण्याच्या सरावानंतरच ती या खेळात तरबेज झाली. स्थानिय स्तरावरील स्पर्धेत भाग घेत पुढे राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक मेडल प्राप्त केले. कोमल ची उत्कृष्ट खेळाच्या बळावर वर्ष 2016 साली युकेत होणाऱ्या बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली होती. तेव्हा तिला भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी ही मिळाली होती मात्र तिच्या सोबत केअर टेकर म्हणून जाणाऱ्याचा व्हिजा नसल्याने ती या मोठ्या संधीला मुकली. मात्र निराश न होता तिने राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेत गोल्ड, सिल्वर व ब्रांज मेडल पटकावले. आज तिच्याकडे स्पर्धेत मिळविलेले प्रमाणपत्र, पदके आहेत. हे दाखवतांना ती भान हरकुन जाते. जीवनातील कटू अनुभवांना तिने केंव्हाच मागे सारले आहे.
कोमल होळीच्या सुट्टीत आपल्या परिवारासह राजस्थान राज्याचा दौरा केला. विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या. दरम्यान जोधपूरमधील कोरना-गंगावस इको-टूरिझम पॉइंटवर तिच्या कुटुंबासह पोहोचली. येथे तिने व्हीलचेअर शिवाय पॅराग्लायडिंग केले. यासाठी तिला सिव्हिल हैंग ग्लायडर आणि पॅराग्लायडिंग एक्सपर्ट समर्थ शर्मा यांनी मदत केली. कोमलने सांगितले की, परत उतरताना थोडे कठीण गेले, पण हा अनुभव अनोखा असा होता.
जाहिरात – डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपला व्यवसाय वाढवा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – +919767421030
वर्ष 2014 मध्ये कोमलचा विवाह रोहित ओस्तवाल सोबत झाला. कोमल ने सांगितले की, लग्नानंतर काय होईल हा विचार मनात आला. मात्र सासु-सासरे नशाबाने चांगलेच भेटले त्यांनी मला आई-वडिलांची कमतरता भासु दिली नाही. पती रोहित चांगल्या-वाईट काळात साथ उभा असतो. त्याचे मला नेहमी प्रोत्साहन मिळते त्याबळावरच मी सामान्य जीवन जगत आहे. कोमल सांगितले की तिने विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिडा स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक पटकावले आहे. बॅडमिंटन खेळासोबतच ती घरकामाबरोबरच मुलांसाठी आणि स्वत:च्या रेस्टॉरंटसाठी ही वेळ काढते.
आतापर्यंत मिळालेले पुरस्कार
- व्हीलचेअर मुंबई मेरायन, मुंबई-2011 (प्रथम)
- मिस व्हीलचेअर इंडिया, मुंबई-2013 बेस्ट स्माइल (अंतिम फेरीत धडक)
- मिस व्हीलचेअर इंडिया, मुंबई-2014 मध्ये कपल डांस (उत्कृष्ट प्रदर्शन)
- जिल्हास्तरीय व्हीलचेअर भाला फेक इंडिया, मुंबई-2015 (द्वितीय)
- जिल्हास्तरीय व्हीलचेअर गोला फेक इंडिया, मुंबई-2015 (द्वितीय)
- जिल्हास्तरीय व्हीलचेअर गोला फेक बॅडमिंटन इंडिया, मुंबई-2015 (तृतीय)
- राज्यस्तरीय व्हीलचेअर बॅडमिंटन इंडिया, मुंबई-2015 (कास्य पदक)
- राष्ट्रस्तरीय व्हीलचेअर बॅडमिंटन इंडिया, मुंबई-2015 (कास्य पदक)
- विशेष ज्युरी अॅवार्ड (आफटरनून व्हाइस छटा न्यूज मेकरअॅवार्ड), मुंबई
- राष्ट्रीय व्हीलचेअर बॅडमिंटन सिंगल मुंबई 2015 (कास्य पदक)
- राष्ट्रीय व्हीलचेअर बॅडमिंटन मिस्ड डबल 2015 (रजत पदक)
- व्हीलचेअर बॅडमिंटन बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चँपियन,लंदन 2015 (निवड)
- राष्ट्रीय व्हीलचेअर बॅडमिंटन सिंगल 2015 सुवर्ण पदक
- औरंगाबाद 2016 में संस्कार भुषण पुरस्कार
Very nice Dii
Thank You! Mamta Pradip Chordia for your valuable comment. Stay tune with us for latest news & entertainment.