By MahaTimes ऑनलाइन – बीड |
राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमात यावर्षी बीड जिल्ह्यात केंद्रस्तरीय सब-नॅशनल सर्टिफिकेशनल अंतर्गत जिल्हा क्षयरोग केंद्र बीडने ब्रॉन्झ पारितोषिकासाठी राष्ट्रीयस्तरावर सहभाग नोंदविला होता. त्यानुसार जागतिक क्षयरोग दिनानिमित्त दिल्ली येथे बीड जिल्ह्याला ब्रॉन्झ पदक प्राप्त झाले.
दरम्यान, जागतिक क्षयरोग दिनी राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख, जिल्हा परिषदेचे 5 अधिकारी यांना त्यांच्या प्रतिमेच्या फ्रेम भेट देण्यात आल्या.
तसेच सन 2021 मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन तालुक्यांची निवड करण्यात आली. प्रथम क्रमांक आलेल्या अंबाजोगाई तालुक्याला फिरता चषक देण्यात आला. व्दितीय क्रमांक बीड तालुका व तृतीय माजलगाव या तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले.
जिल्ह्यातील प्रत्येकी तीन वैद्यकीय अधिकारी, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, लॅब टेक्नीशियन, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आशा वर्कर आणि खाजगी क्षेत्रातील डॉक्टर, ठोक खाजगी औषध विक्रेते, आयएमए अध्यक्ष बीड, फूड व ड्रग इन्पेक्टर यांना क्षयरोग उत्कृष्ट कामकाजाबद्दल सन्मानित करण्यात आले. सब नॅशनल सर्टिफिकेशनल अंतर्गत सर्व्हे करण्यात आलेल्या 15 टीम मेंबर्सला प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले.
जाहिरात – डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपला व्यवसाय वाढवा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – +919767421030
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्षयरोग कार्यक्रमाचे उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हा क्षयरोग कार्यालयाचे 19 कर्मचाऱ्यांना हेल्मेट वाटप करण्यात आले.