पटेल, नाईकवाडे, लोढा व घुमरे यांचे शिवसेनेत जोरदार स्वागत
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
राजकारणात चढउतार येत असतात, कााही लोक अपघाताने पदावर येतात. मात्र, ज्या चूका झाल्या त्या दुरुस्त करण्याची ही योग्य वेळ आहे. आम्ही सुडाच राजकारण कधी केलं नाही असे विचार माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी सोमवारी शिवसेना प्रवेश सोहळा प्रसंगी मांडले. पुढे म्हणाले की, देर से आये, दुरुस्त आए. पाच जणांच्या प्रवेशाने आपली टीम मजबूत झाली आहे, आता मैदान मोकळे आहे. कोणाची विकेट घ्यायच्या त्या घ्या असे सांगुन त्यांनी प्रवेशकर्ते नेते व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पासून कांही दिवस अलिप्त राहिलेले बीड नगर पालिकेचे गटनेते फारूख पटेल, नगरसेवक अमर नाईकवाडे, नितीन लोढा, बाबुशेठ लोढा, जि.प सदस्य गंगाधर घुमरे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह सोमवारी सायंकाळी बशीरगंज भागात झालेल्या शानदार प्रवेशसोहळ्यात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी जयदत्त क्षीरसागर बोलत होते. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे, मा. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव, संपर्क प्रमुख आनंद जाधव, युवा नेता योगेश क्षीरसागर, जेष्ठ नेते मोईन मास्टर, माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, माजी जिल्हाप्रूमख सचिन मुळूक, बाळासाहेब पिंगळे, बप्पासाहेब घुगे, नितीन धांडे, किशोर पिंगळे यांची उपस्थिती होती.
ते घर बेघर झालं म्हणून ‘हे’ परतले -डॉ क्षीरसागर
डॉ. भारतभुषण क्षीरसागर म्हणाले कि, पाच पांडव हे आमचेच होते, आधी आमच्याच घरात होते. दूसरं घर झाल्याने ते तिकडे गेले. मात्र, ते घर बेघर झालं म्हणून हे परत मूळ घरात आले आहे. त्यांना ते आता कळल्यानंतर परत आले. यापुढे ते सोबत राहतील. या पाच जणांची घरवापसी झाली आहे. असे ते म्हणाले.
कोण काय म्हणाले…
- अनिल जगताप : पाच पांडव आज शिवसेनेवर विश्वास ठेवून जो प्रवेश केला आहे. येणाऱ्या काळात सर्व निवडणूका आम्ही ताकदीने लढू.शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या पालिका निवडणूकीत 40 सदस्य असतील. शिवसेना कधीच मुस्लिम विरोधी नाही. सेनेने साबीर शेख असोत की अब्दुल सत्तार यांना मंत्रिपदाची संधी दिली, त्यामुळे मुस्लिमांनी घाबरून जायचे कारण नाही असे जिल्हाप्रमुख अनिल जगताप म्हणाले. या पाच जणांचे आम्ही शिवसेनेत स्वागत करीत आहोत.
- योगेश क्षीरसागर : आमदार झाले की आपण जणू आकाशाला स्पर्श केला अशी भावना संदीप क्षीरसागर यांची झाली. आपल्यासाठी ज्यांनी जीवाचे राण केले, पदरखर्च करून आमदार बनविण्यासाठी प्रयत्न केले अशांना हळू हळू बाजुला केलं. त्यामुळे सच्चे कार्यकर्ते त्यांच्यापासुन दुरावले. या आमदारांनी प्रत्येक कामात टक्केवारी घेतल्याचा गंभीर आरोप ही डॉ. योगेश क्षीरसागर यांनी केला. याचा अनुभव आज प्रवेश करणाºयांना झाला आहे. ये तो बस शुरुआत हैं. पुढे ते म्हणाले की, फारूख पटेल यांचा आग्रह होता की हा कार्यक्रम ऐतिहासिक बशीरगंज भागात व्हावा. त्यानुसार येथे कार्यक्रम घेण्यात आला. आप इससे पहले लोगों के बहकावे में आकर मतदान किया. इसका परिणाम सभी भूगत रहे हैं. असे सांगुन ते म्हणाले की, यापुढे कोणाच्या बहकाव्यात येउ नका. ये तो बस शुरूआत हैं असा डायलॉग देखील मारला.
- फारूख पटेल : माझा राजकिय जन्म राष्ट्रवादीत झाला. 2011 ला पहिली निवडणूक लढविली. संदीप क्षीरसागर यांना आमदार केले परंतु त्यांनी जाणीव ठेवली नाही. समाजाचे प्रश्न घेउन आमदारासमोर गेलं तर ते पहिलं तर टाळतात म्हणतात की, तुमचं वैयक्तिक काही काम असेल तर सांगा. आता सर्वांनाच माहिती आहे की, आम्ही केवळ जनतेसाठी काम करीत आहोत. आमच्यासाठी समाज व जनताच सर्वकांही आहे.
- अमर नाईकवाडे : जयदत्त क्षीरसागर यांच्यामुळे आम्हाला नगरसेवक पद मिळाले. त्यामुळे आम्ही त्यांच्या माध्यमातुन शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे कोणीही किंतु, परंतु मनात ठेऊ नये. आता आम्हाला जिल्ह्यात सेनेचं पीक आणायचं आहे. असे सांगुन नाईकवाडे पुढे म्हणाले की, काकू नाना आघाडी चे आम्ही काम केले. पदासाठी आम्ही कधीही सोबत नव्हतो. ते आमदार झाल्यावर रवी दादा सोबत कसे वागले हे आत्मी पाहिलं. जो माणूस स्वत:च्या बाबासोबत चुकीचे वागतो. सहका-यांवर ब्लॅकमेलिंग चे आरोप करतात. जुन्या कामाचे श्रेय घेतात. तुम्हीच काम आडवायचं आणि नंतर डफडं वाजवून उद्घाटन करायचं हा काय धंदा आहे. आमची नाहक बदनामी केली तर अंडे पिल्ले बाहेर काढू असा सज्जड दम ही नाईकवाडे यांनी दिला.
- गंगाधर घुमरे : पाठिमागच्या काळात आमच्याकडून चुक झाली चांगल्या माणसाला आम्ही घरी बसविले. परंतु येणाऱ्या काळात आपण मिळून जयदत क्षीरसागर यांच्याकडे जिल्ह्याचे नेतृत्व देऊ.
- नीतीन लोढाः आम्ही आ . क्षीरसागर यांना मदत केली पण त्यामुळे आमचा भाग मागास राहिला. आमचं ठरलय, अन्यायाच्या विरूध्द लढायचं. सर्व ताकद पक्षाच्या मागे उभी करू.
- बाबुशेठ लोढा : आमची अपेक्षा ऐवढीच होती. निवडणूकीत दिलेला शब्द पाळला जावा. परंतु तसे न करता ग्रामीण भागातील जनतेला दिलेले शब्द हे विसरले आहेत. 45 वर्षांच्या कालावधीत असा निष्क्रीय आमदार पाहिला नाही.
जाहिरात – डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपला व्यवसाय वाढवा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – +919767421030