दोन्हीही संघटना संपात सहभागी, बीड विभागातील टपाल सेवा ठप्प
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
नवीन पेन्शन योजना रद्द करून पूर्ववत जुनी पेन्शन योजना सर्वाकरिता लागू करा, डाक विभागाच्या खाजगीकरणांच्या हालचाली थांबवा, यासह सरकारच्या कामगार विरोधी धोरणाबाबत टपाल विभागातील दोन्हीही मान्यताप्राप्त संघटना सहभागी झाल्यामुळे बीड विभागातील टपाल सेवा ठप्प झाल्याचा दावा टपाल संघटनेचे नेते धनंजय शेंडगे यांनी केला आहे.
टपाल विभागातील दोन्हीही मान्यताप्राप्त संघटना आपल्या केंद्रीय संघटनेच्या आवाहनानुसार संघटनेचे सभासद या दोन दिवसीय संपात सहभागी झालेले आहेत. आज संपाच्या पहिल्यादिवशी बीड प्रधान डाकघराच्या समोर द्वारसभेचे आयोजन केले होते सभेस धनंजय शेंडगे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, जुनी पेन्शन योजना सर्वाकरिता लागू करा, कामगार कायद्यात सकारात्मक बदल करा टपाल विभागातील संघटनेच्या पदाधिकाऱ्याची छळवणूक थांबवा, कोरोनाकाळात सेवा देत असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्याच्या वारसास दहा लाख रुपयांची आर्थिक मदत द्या व त्याच्या वारसास अनुकंपावर सेवेत सामावून घ्या यासह सर्व मागण्यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
सभेस संघटनेचे विभागीय अध्यक्ष सज्जाद शेख, शिवाजी नवले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विशाल घोरड़, दीपक कुडके किरण सावंत नितिन हजारे नितिन आमटे, फिरोज पठान, वसंत भानोसे, भारत वारंगुले, पोस्टमेन संघट नेचे सचिव महादेव रसाल, पराजी उगले, सचिन पुण्डे दौलत शिंदे, गंदे, हानू कांबले यांचेसह मोठ्या संख्येने सभासद बांधव उपस्थित होते.
प्रमुख मागण्या:
- नवीन पेन्शन योजना रद्द करून पूर्ववत जुनी पेन्शन योजना सर्वाकरिता लागू करणे.
- टपाल विभागाचे खाजगीकरणाचे धोरण थांबवणे.
- कामगार संघटनेवरील हल्ले थांबवणे.
- डाक विभागातील रिक्त जागा भरणे.
- थकीत महागाई भत्ता त्वरित देणे.
- कोरोनामुळे मयत झालेल्या कर्मचाऱ्याचा वारसास दहा लाखाचे आर्थिक मदत करणे.
- वारसास अनुकंपा वर सेवेत सामावून घेणे.
- ग्रामीण डाक सेवकांना कमलेश चंद्र कमिटीच्या शिफारशी लागु करणे.
जाहिरात – डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपला व्यवसाय वाढवा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – +919767421030