28 मार्चला माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत करणार शिवसेनेत प्रवेश
बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार
By MahaTimes ऑनलाइन – बीड | रईस खान
बीड नगर पालिका निवडणुक जशी जशी लांबणीवर पडत आहे. तसं तसं आमदार संदीप क्षीरसागर यांची पकड ढिली पडत आहे. आमदारांचे समर्थक नाराज होउन वेगळे होताच काका जयदत्त क्षीरसागर व डॉ. भारतभुषण क्षीरसागर यांच्या गळाला लागत आहेत. कांही दिवस अलिप्त राहिलेले आमदार समर्थक आगामी पालिका निवडणूकीत तिसरी आघाडी उघडण्यासाठी चाचपणी करणारे फारूख पटेल, अमर नाईकवाडे सह गंगाधर घुमरे, नितीन लोढा व बाबुशेठ लोढा यांनी आमचं ठरलं…म्हणत येत्या 28 मार्चला जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत. हा प्रवेश सोहळा आमदार गटासाठी मोठा हादरा माणला जात आहे.
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे संदीप क्षीरसागर यांना आमदार करण्यासाठी जीवाचे राण करण्यांच्या पदरी फक्त आश्वासने पडली. युवा आमदारांकडून त्यांना खूप अपेक्षा होत्या मात्र, मधल्या काळात अनेक जण त्यांचापासुन दुरावत गेली. गेली अनेक महिण्याापासुन अलिप्त राहिलेले खंदे समर्थक पालिका गटनेते फारूख पटेल, अमर नाईकवाडे, गंगाधर घुमरे, नितीन लोढा व बाबुशेठ लोढा येत्या 28 मार्चला शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार असून कार्यक्रमाची तारिख, वेळ, स्थळपण निश्चित झाले आहे. एकाच वेळी पाच मोठे नेते राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीला राम राम ठोकत जय महाराष्ट्र म्हणत शिवसेनेत प्रवेश करणार असून हा संदीप क्षीरसागर सह राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीला मोठा हादरा देणारा आहे. शिवसेनेने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेउन सावज पवित्रा घेत आपली ताकद मजबूत करण्यावर जोर दिला आहे. यासोबत विरोधकांना कमजोर करण्यावर ही दिला जात आहे.
सोमवारी सायंकाळी छत्रपति शिवाजी महाराज चौक परिसर, जिल्हा परिषद कार्यालय समोर होणार्या यह प्रवेश सोहळ्याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागुन आहे. बीड विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व शिवसेना हे दोनच प्रबळ पक्ष आहेत. आमदार संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर गटाचे दोन समर्थक आपल्या गटात आणले तर काका जयदत्त क्षीरसागर आणि भारतभुषण क्षीरसागर यांनी समोरच्या गटाचे दुप्पट समर्थक आपल्याकडे ओढत आहेत. या दोघांच्या चढाओढीत काका-पुतण्याच्या लूटुपुटच्या लढाईला कंटाळलेले कार्यकर्ते आता तिसर्या आघाडीची भाषा करीत आहेत. यात कोणाचा लाभ होईल. तिसरी आघाडी मताचे ध्रुवीकरण करण्यात कितपत यशस्वी होईल हे येणारा काळच सांगेल.
शिवेसेनेसाठी ही निवडणूक म्हणावी तेवढी सोपी नाही
नुकत्याच पार पडलेल्या नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेचा दारून पराभव झाला. अनेक उमेदवारांचे डिपॉजिट गुल झाले, तर कांही ठिकाणी नोटा पेक्षी ही कमी मते पडली. मात्र अपयशापासुन बोध घेत शिवसेना नेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर मागे वळून न पाहता पूर्ण ताकदीनिशी आपले काम करीत आहे. यंदा जिल्ह्यातील नगर पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहेत.
त्यांच्या सोबतीला अनुभवी जिल्हाप्रमुख अनिल जगताप व जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव हे राहणार आहेत. नगर पालिका निवडणूक शिवेसेनेला म्हणावी तेवढी सोपी नाही. बीड वगळता गेवराई, माजलगाव, धारूर, परळी व अंबाजोगाई येथे चांगलेचे घाम गाळावे लागणार आहे.