ऑल इंडिया पयाम-ए-इन्सानियत फोरमचा उपक्रम
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
येथील ऑल इंडिया पयाम-ए-इन्सानियत फोरमच्यावतीने जागतिक जल दिनाच्या पार्श्वभूमिवर शहरातील मध्यवर्ती भागातील शिवाजी महाराज पुतळा नजीक मंगळवारी कर्तव्यदक्ष पीएसआय महादेव ढाकणे सर यांच्याहस्ते शहरात पाणपोई आणि नशामुक्ती अभियान चा शुभारंभ करण्यात आला.
शहरातील ऑल इंडिया पयाम – ए – इन्सानियत फोरम गेल्या काही वर्षांपासून सर्वधर्म समभाव, शांती प्रस्थापित करण्यासाठी काम करत आहे. ही अराजकीय संघटना असुन मानवतेचा संदेश देण्याच्या हेतूने शहरात कार्यरत आहे. आपल्या आयुष्याचा एक भाग समाजकार्यासाठी देण्यासाठी संस्थेचे व्हॉलिंटिअर सतत प्रयन्तशील असतात.
एआयपीआयएफ (AIPIF) ने गेल्या काही वर्षात शहरात शासकीय रु ग्णालय, बस स्टैण्ड व फुटपात या ठिकाणी भेटी देउन गरीब व गरवंतांसाठी मदतीचा हाथ पुढे करीत आहे. रूग्ण, प्रवाशी यांच्यासाठी अन्न वाटप कार्यक्रम, मेडिकल कैम्प, रक्तदान शिबीर, विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्र म, माझे शहर माझी जिम्मेदारी ( उपक्र म ), नशामुक्ती अभियान, भूक मुक्त एक शाम एकता के नाम इत्यादि उपक्रम राबवून याचा लाभ सर्व जातिधर्माच्या लोकांना देउन समाजमध्ये माणुसकीची वृध्दींगत करण्याचा प्रयत्न करीत आहे.
पाणपोई आणि नशामुक्ती अभियान चा शुभारंभ प्रसंगी पीएसआय महादेव ढाकणे यांनी ऑल इंडिया पयाम-ए-इन्सानियत फोरमच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. याप्रसंगी आयोजक मोहम्मद सईद सर, सय्यद अब्बास, सय्यद असलम, हाफेज फैजान, शेख शाहरूख, शेख इलियास, शेख अरबाज आदि उपस्थित होते.