टॅलेंट सर्च अॅकॅडमीचा ‘व्हिजन 2030’ उपक्रम
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
प्रत्येक मुलांची बुद्धिमत्ता सारखी नसते, त्यांची आवड निवड वेगळी-वेगळी असते त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नये. मुश्ताक अन्सारी सारखे लोकं आपली जबाबदारी ओळखून काम करीत आहे अशा लोकांची नक्कीच साथ द्यावी. आपण ज्या समाजात राहतो, जीवन व्यतीत करतो त्या समाजाप्रति आपली ही कांही जबाबदारी असते असे विचार न्यायाधिश खाजा फारूख अहमद साहेब यांनी टॅलेंट सर्च अॅकॅडमी आयोजित कार्यक्रमात बोलतांना मांडले.
टॅलेंट सर्च अॅकॅडमी आयोजित ‘व्हिजन 2030’ उपक्रम संदर्भात माहिती देण्यासाठी मुश्ताक अहमद अन्सारी यांनी रविवारी विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवर लोकांची बैठक न्यायाधिश खाजा फारूख अहमद यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी न्या. खाजा फारूख बोलते होते. याप्रसंगी माजी आमदार सय्यद सलीम, अॅड. शेख शफीक भाऊ, खिदमत-ए-खल्क चे मौलाना अब्दुल बाकी हुस्सामी, तामिर चे संपादक काझी मगदूम, कांग्रेस चे नेते फरीद देशमुख आदि उपस्थित होते.
माजी आमदार सय्यद सलीम म्हणाले की, सध्या स्पर्धेचे युग आहे. आर्थिकदृष्टया गरीब मुस्लिम समाज शिक्षणात मागासलेला आहे. या समाजातील मुले प्रशासकीय क्षेत्रात मगर ते तलाठी असो, ग्रामसेवक असो किंवा तहसीलदार, जिलाधिकारी असो पुढे आले पाहिजे. टॅलेंट सर्च अॅकॅडमी आपला व्हिजन समोर ठेवून प्राथमिक लेवल च्या विद्यार्थ्यांवर मेहनत करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह्य असा आहे. मी यासाठी माझ्या वाट्याला जी रक्कम येईल ती देण्यास तय्यार आहे. अॅड. शेख शफीक भाऊ यांनी ही मुश्ताक अहमद अन्सारी यांच्या निर्णयाचे स्वागत केले. हे एक चांगले काम असून याचे माझ्यासह इथे उपस्थित सर्वच जण अन्सारी यांच्या सोबत असल्याचे सांगितले. यावेळी शफीक भाऊनी मारवाडी समाज व्यापाराबरोबरच प्रशासकीय सेवेत येत आहे. यापासुन आपणांस बोध घेण्याची गरज असल्याचे म्हणाले.
सदर बैठकीत टॅलेंट सर्च अॅकॅडमीचे संचालक मुश्ताक अहमद अन्सारी यांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले की, अॅकॅडमी व्हिजन 2030 घेडन समाजबांधवांसमोर जात आहे. मातृभाषा उर्दू असलेल्या 5 वी व 7 वी वर्गातील कुशाग्र बुध्दीच्या मुलांची माहिती संकलित करून त्यांची एक परीक्षा घेण्यात येणार आहे. यात उर्त्तीर्ण विद्यार्थ्यांमधुन 30 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना मोफत ट्रेनिंग दिली जाईल.
येत्या 1 जूनपासुन व्हिजन 2030 वर काम केले जाईल. यासाठी जवळपास 12 लाख रूपए खर्च येत असून हा खर्च पीपल्स एज्युकेशन सोसायटी उचलणार आहे. एकाच छताखाली व ते पण मोफत शिक्षण देउन स्पर्धापरीक्षेसाठी तयार करण्याचा आमचा मानस आहे. पालकांना फक्त मुलांना नेआण करण्याव्यतीरिक्त कांही करायची गरज राहणार नाही. असेही मुश्ताक अहमद अन्सारी यांनी स्पष्ट केले आहे.
या बैठकीस मुदिस्सर सेठ, हुमेर सलीम, वकील सर, खालेद भाई अपेक्स, मोमिन इसाक सर, शेख मुजीब संपादक सिटीजन, पत्रकार अमजद पठान, अबूबकर चाउस, जाहिद सर मिल्लत स्कूल, आदिल सर, अजीम सर गुरु कुल स्कूल, विकार सर मेड एक्सीलेंस, यासेर खान स्पेस अकादमी, डॉ अनीस, डॉ. सेरी अब्दुल्लाह, डॉ. अब्दुस समद, डॉ. शौकतुल्ला हुसैनी, डॉ. जुबेर हुसैनी, फरीद नेहरी सर, डॉ. फैसल चाऊस, इरफान सादुल्लाह मिल्लिया स्कूल, नवीद सिद्दीकी सर नेशनल स्कूल, रजीउद्दीन सर नेशनल, काजी मुजीबुर रहमान, हसीन अख्तर, नसीर अन्सारी, सय्यद सादेखज़मा, रफीक सर, मुज्जतबा अहेमद, जमील बागवान नूतन इंग्लिश स्कूल, रईस पठान, अफरोज शेख, मुख्याध्यापक सज्जाद अहेमद सर, पत्रकार एजाज अहमद, सिराज आरजु, जावेद पाशा, संपादक रईस खान, आदि उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्र संचलन अब्दुल रहीम उर्फ गुलाम साकिब यांनी केले.