जागतिक ग्राहक हक्क दिनाचा समारंभ संपन्न
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
ग्राहकांना जे 6 हक्क कायद्याने दिलेले आहेत. त्याची जाणीव असणे गरजेचे आहे. यामध्ये सुरक्षेचा हक्क, माहिती मिळविण्याचा हक्क, निवड करण्याचा हक्क, मत मांडण्याचा हक्क, तक्रार आणि निवारण करण्याचा हक्क, तसेच ग्राहक हक्काच्या शिक्षणाबाबतचा हक्क हे ते सहा हक्क आहेत. या हक्कांबरोबर ग्राहकांना आपले हक्क, जबाबदारीची देखील पूर्ण करणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले.
जागतिक ग्राहक हक्क दिनाचा समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झाला, याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. शर्मा बोलत होते, समारंभास अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, पोलीस उप अधीक्षक श्रीपाद परोपकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमुख, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या विभागीय संघटक शैलजा सेलमोहकर, जिल्हाध्यक्ष आर.टी. गरजे, व जिल्हा संघटक एड नरेंद्र कुलकर्णी, नायब तहसीलदार अनिता भालेराव, नायब तहसीलदार संजय सोनवणे, गटशिक्षणाधिकारी श्री टेकाडे, विविध विभागांचे अधिकारी, स्पर्धेतील विजेते व ग्राहक हक्काबद्दल जागरुक असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री शर्मा म्हणाले, राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन व जागतिक ग्राहक हक्क दिन हे आपण साजरे करतो. पण हे का सुरू झाले याबाबत आपणास फार कमी माहिती असते. ग्राहक म्हणून किंवा पैसे देऊन आपण खरेदी करत असलेली वस्तू व सेवा ही घेताना तिथे दर्जा व किंमत ही योग्य मिळते का जर मिळत नसले तर आपण त्याची तक्रार करण्याचा आपणास हक्क आहे. ग्राहक म्हणून आपल्या हक्कानुसार सुविधा मिळवावी हाच याचा उद्देश आहे. ते पुढे म्हणाले, जिल्हा स्तरावर आता पन्नास लक्ष रुपयांपर्यंत च्या तक्रारी ग्राहक करु शकतात. बँकेबाबत असलेली आपली माहिती आपण गोपनीय राखली पाहिजे. बँक अकाउंट नंबर ओटीपी व इतर संबंधित माहिती अज्ञानाने आपण कुणाला देऊ नये. यामुळे आपली फसवणूक होऊ शकते.
अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे म्हणाले, ग्राहक हक्क दिन हा साजरा करण्यापेक्षा तो आत्मपरीक्षण करणारा दिवस व्हावा. आपण शेतकऱ्याला भाजी खरेदी करताना दर कमी करून खरेदी करतो. पण इतर अनेक ठिकाणी मॉलमध्ये, शोरूम मध्ये मात्र वस्तू कोणतेही दर कमी न करता घेतो. भारतामध्ये अर्थव्यवस्था खुली झाल्यानंतर मोठ्या उत्पादक कंपन्यांनी विविध प्रकारे जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करून आपला नफा वाढविला आहे. यामुळे आपण गरजेपेक्षा अधिक असलेल्या वस्तू खरेदी करतो. शासकीय कार्यालयात येणारा नागरिक देखील विविध प्रकारचे शासकीय शुल्क अदा करत असल्याने त्याला देखील ग्राहकाचे हक्क आहेत व त्यानुसार वागणूक मिळाली पाहिजे, असे याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी म्हणाले.
याप्रसंगी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या श्रीमती सेलमोहकर, प्रा. आर.टी.गर्जे, ॲड.श्री. कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 1986 मध्ये आपल्या देशात ग्राहकांच्या हक्काबाबत कायदा झाला आहे. त्या कायद्यात 2019 मध्ये सुधारणा करण्यात आले आहे. सध्या ‘ई-कॉमर्स’ चा असून ग्राहकाच्या तक्रारीचे स्वरूप देखील बदलले आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये बँका एटीएम ऑनलाइन खरेदी विक्री याचे प्रमाण वाढले असल्याने त्यानुसार बदल होत आहेत आपण ग्राहक म्हणून आपल्या हक्काबाबत जागरूक आहोत का हे पाहिले पाहिजे वस्तूंचा दर्जा निश्चित करणाऱ्या हाय असो ऍगमार्क हॉलमार्क अशा प्रमाणात बाबून बाबींचा आग्रह धरला पाहिजे खरेदी करताना टॅक्स पावती घेण्याची गर यामुळे फसवणूक झाल्यास आपणास दाद मागता येते, असे वक्त्यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार श्री सोनवणे यांनी केले. आभार प्रदर्शन श्रीमती भालेराव यांनी केले. आजच्या जागतिक ग्राहक हक्क दिनाचे औचित्य साधून विविध शासकीय विभाग व पुरवठा धारांनी माहिती देणारे स्टॉल्स जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर प्रदर्शित केले होते. नागरिकांना माहिती दिली जात हेाती.