खटोड प्रतिष्ठान व शिक्षकांचे योगदान
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
येथील जिला परिषद प्राथमिक शाळा अशोकनगर येथील दिडशे विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वितरित करण्यात आले. यात स्व. झुंबरलाल खटोड प्रतिष्ठान व शाळेतील शिक्षकांनी योगदान दिले. हा कार्यक्रम सोमवारी सकाळी पार पडला.
जागतिक महिला दिनानिमित्त गेल्या आठवड्यात अशोकनगर जिप शाळेत महिला व पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गौतम खटोड यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान गोरगरीब पालकांनी मुलांना शैक्षणिक साहित्याबाबत विनंती केली. सोमवारी (दि. 14) रोजी श्री. खटोड व शिक्षकांनी पुढाकार घेऊन 150 मुलांसाठी 10 हजार 600 रूपयाच्या 450 वह्यांचे वाटप केले.
याप्रसंगी गौतम खटोड, नगरसेवक संजय उढाण, स्थाई समिती सदस्य मा.सभापति खुर्शीद आलम, शालेय समिती अध्यक्ष शेख उस्मान, समाजसेवक धर्मराज मागदे, धोंगडे, जिनीअस ऑटो युनियनचे अध्यक्ष बाबुभाई, विषय तज्ज्ञ आफरीन पठाण, मुख्याध्यापक शेख मुसा यांची उपस्थिती होती.
शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी मुख्याध्यापक शेख मुसा यांनी शाळेसाठी साऊन्ड सिस्टिम ची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावर नगरसेवक संजय उढाण व स्व. झुंबरलाल खठोड प्रतिष्ठान तर्फे शाळेला साऊन्ड सिस्टिम देण्याचे मान्य केले.
या वेळी गौतम खटोड, संजय उढाण, खुर्शीद आलम यांनी मार्गदर्शन केले. गोरगरीबांची मुले बिकट परिस्थितीवर मात करीत मोठ्या पदावर गेली आहेत. यामुळे शिक्षकांनी ज्ञानदानाबरोबरच मुलांच्या पालकाची भूमिका पार गरजेचे आहे असे विचार मांडले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाळेच्यावतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार शोभा कदम यांनी मानले. कार्यक्र मास शिक्षकांनी मोलाचे योगदान दिले.