संदिप उपरे यांची पत्रकार परिषद : बीडमध्ये 19 मार्च रोजी हनुमंतराव उपरे काकांचा स्मृती समारंभ, भव्य मोटारसायकल रॅली, अर्धाकृती पुतळयाचे अनावरण व गौरव ग्रंथ प्रकाशन कार्यक्रम
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
सत्यशोधक ओबीसी परिषदेचे संस्थापक स्मृतीशेष हनुमंतराव काका उपरे यांनी ओबीसींच्या ज्वलंत प्रश्नावर विधायक आणि रचनात्मक कार्य करण्यासोबतच ओबीसी बांधवांना संघटीत करून बौध्द धम्माची चळवळ गतिमान करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचे कार्य भावी पिढीसाठी प्रेरणादायी आहे. येत्या 19 मार्च रोजी काकांचा स्मृति दिनानिमित्त अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण सह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती प्रदेशाध्यक्ष संदिप उपरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
सत्यशोधक ओबीसी परिषदेच्यावतीने मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत संदीप उपरे म्हणाले की, शनिवार (दि. 15) रोजी सकाळी 8.00 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास अभिवादन कार्यक्रम होईल. यानंतर मान्यवराच्या हस्ते मोटारसायकल रॅलीला सुरु वात होईल. ही रॅली ही सुभाष रोड, आण्णाभाऊ साठे चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महापुरु षांच्या पुतळयास अभिवादन करत जालना रोड मार्गे कार्यक्र म स्थळाकडे रवाना होईल.
संदीप उपरे पुढे म्हणाले की, स्मृतिशेष हनुमंतराव उपरे काका यांनी महाराष्ट्रभर मंडल रथयात्रा, राज्यस्तरीय साहित्य संमेलन, पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यासंबंधीत आंदोलनाचे त्यांनी सक्षम नेतृत्व केले. तसेच ओबीसी, उपेक्षित, पीडीत यांना त्यांच्या हक्काप्रति जागृत करण्यासाठी अनेक पुस्तकांचे सैद्धांतिक लेखनही त्यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेत सल्लागार संतोष उपरे, मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मण ढवळे, प्रा.प्रदीप रोडे, प्रा.लक्ष्मण गुंजाळ, अमरसिंह ढाका, आदी उपस्थित होते.
डॉ. बोबडेंच्या धम्म कार्याचा गौरव
माजलगाव येथील डॉ. डिगांबर बोबडे यांच्या अविरत धम्म कार्याची दखल घेत, सत्यशोधक ओबीसी परिषदेकडून त्यांना स्मृतिशेष हनुमंत काका उपरे धम्मरत्न पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत संदिप उपरे यांनी दिली. हा पुरस्कार प्रति वर्षी राज्यातील धम्म चळवळीत असामान्य कार्य करणार्या व्यक्तीला प्रदान करण्यात येतो.