जिल्ह्यात लोककलाच्या माध्यामातून जागर, मोहिमेत कलापथकाने 63 कार्यक्रम सादर केले
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ‘लोककलाच्या माध्यामातून जागर’ या मोहिमेत नागरिकांना लोककलांच्या माध्यमातून व त्यांच्या बोली भाषेत समजावून सांगत जनजागृती केली जात आहे. विद्यमान राज्य सरकारची दोन वर्षपूर्तीची माहिती देतानाच शासनाच्या योजना कलापथकाच्या सादरीकरणातून जनतेपर्यंत पोहचत आहेत.
जिल्ह्यात 9 मार्च पासून सुरू असलेल्या या मोहिमेत आजपर्यत 63 कार्यक्र म सादर झाले आहेत. आज दिवसभरात जिल्ह्यातील विविध गावांमध्ये 10 कार्यक्र म सादर करण्यात आले. यामध्ये जय भवानी कलापथकाच्या माध्यमातून वडवणी तालुक्यातील चिंचाळा बाहेगव्हाण आणि वडवणी शहरात कार्यक्र म झाले तसेच समता कलापथकाने आष्टी तालुक्यातील पिंपरी घाट धामणगाव व आष्टी या ठिकाणी कार्यक्र म सादर केले तर तांबवेश्वर कलापथकाने पाटोदा तालुक्यातील डोंगर किनी महा सांगवी पाटोदा व तांबाराजुरी येथे कार्यक्र म सादर केले.
माहिती व जनसपर्क महासंचालनालय यांच्या जिल्हा माहिती कार्यालया मार्फत 9 मार्च या कालावधीतमध्ये कलापथकांच्या माध्यमातून जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. महाविकास आघाडी शासनाला दोन वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने लोकाभिमूख शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचिवण्यासाठी जिल्ह्यामध्ये कलापथक विविध भागात काम करत आहे. या कलापथकांनी तालुक्यातील येथील बाजारपेठ तसेच वर्दळीच्या ठिकाणी कलेच्या माध्यामातून शासकीय योजना उपक्र म हे स्थानिकापर्यंत पोहचिवले आहे.
जनजागृती मोहिमेत काल जवळपास 11 कार्यक्र म सादर करण्यात आले. यामध्ये जयभवानी कला पथकाचे अंबाजोगाई तालुक्यातील पिंपळा धायगुडे, चनई येथील कार्यक्र म धारु र तालुक्यातील कारी व वडवणी तालुक्यातील कुपा येथे कार्यक्र म झाले. समता कला पथकाचे आष्टी तालुक्यातील हातोळा, कापसी, गरजेवाडी, डोईठाणा येथे तर तांबवेश्वर कलापथकाने पाटोदा तालुक्यातील भायाळ, सोनी सावरगाव, थेरला येथे कार्यक्र म सादर केले होते. या मोहिमेत 3 कलापथकांच्या जवळपास 30 कलाकार व सहकार्यांच्या सहभागाने आजपर्यत 63 कार्यक्र म सादर झाले आहेत.
या मोहिमेसाठी पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार संदिप क्षीरसागर, आमदार संजय दौड तसेच जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्यासह गावातील विविध सरपंचांचे देखील सहकार्य आणि मान्यवरांच्या शुभेच्छा लाभल्या आहेत.