By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बीड तालुक्यातील म्हाळसजवळा सज्जाचे ( ता. बीड ) मंडळ अधिकारी नितीन जाधव यांचा राक्षस भवन येथील अपघाती मृत्यू झाला होता. जाधव यांचे मृत्यूंची सी.आय.डी.मार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी समाज सेवक मुकरमजान पठाण यांनी प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई व विभागीय आयुक्त औरंगाबाद तसेच जिल्हाधिकारी बीड व पोलीस प्रमुख बीड यांना निवेदन देण्यात आले.
म्हाळसजवळा सज्जा येथे कार्यरत असलेले नितीन जाधव, मंडळ अधिकारी यांचे दि. 06/03/ 2022 शनिवारी रात्री गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन, सावळेश्वर, म्हाळसपिंपळगाव येथे अवैध गौण खनिज वाहतूक विरोधात बीडचे तहसिलदार सुरेंद्र डोके आणि खाजगी व्यक्ती बरोबर स्वतःची चार चाकी वाहन मारुती सुझुकी विटरा ब्रिझा ZDI वाहन क्र. MH 23 AD 4435 मध्ये बसून स्वतः ड्रायव्हींग करत राक्षसभूवनकडे वाळू माफियांचे गाडया पकडण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी त्यांचा अपघात होऊन जागीच मृत्यू झाला असे बातम्या प्रसारीत झाले आहे.
श्री सुरेंद्र डोके तहसीलदार यांना मा. जिल्हाधिकारी साहेब बीड यांनी त्यांचे दि. 22/02/ 2022 रोजीचे आदेश गेवराई तालुक्यातील अनाधिकृत गौन खनिज उत्खनन आणि वाहतूक यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याबाबत पथक गठीत केले असून गेवराई तालुक्यातील अनाधिकृत गौन खनिज उत्खनन बाबत या समितीमध्ये श्री सुरेंद्र डोके तहसीलदार यांना घेतले आहे.
अनाधिकृत गौण खनिज उत्खनन जागेवर जाण्यापुर्वी वरिष्ठांनी काही नियम अटी ठरवून दिले असतांना सुध्दा श्री सुरेंद्र डोके तहसीलदार यांनी सर्व नियम अटी आपल्या स्वार्थासाठी धाब्यावर बसून एका तरुन कर्मचाऱ्याचा नाहक बळी घेतला आहे. प्रशासनाने नितीन जाधव यांचे मृत्यूंची सखोल चौकशी व्हावी म्हणून खालील मुद्दांबाबत CID मार्फत चौकशी करण्यात यावी जणेकरुन आपले निदर्शनास सत्य बाहेर येईल की नितिन जाधव यांचा अपघात झाला की घात झाला सर्व सत्य बाहेर येईल. पोलीस व महसूल बरोबर संयुक्त कार्यवाही करणे अपेक्षीत होते. हि कार्यवाही का करण्यात आली नाही?
शासकीय वाहन घेवुन जाणे अपेक्षीत होते असे न करता खाजगी वाहन का घेवून गेले? वरीष्ठ अधिकारी मा. जिल्हाधिकारी साहेब, अप्पर जिल्हाधिकारी साहेब , निवासी उपजिल्हाधिकारी साहेब यांची परवानगी घेणे आवश्यक असतांना परवानगी घेण्यात आली होती का ? सोबत खाजगी इसम का घेण्यात आले तो व्यक्ती कोण? सुरेंद्र डोके तहसीलदार यांनीअपघात झाला याची खबर वरीष्ठांना न देता वाळू माफियांना का देण्यात आली? ज्यांनी सुरेंद्र डोके तहसीलदार यांना जिल्हा रुग्णालयात भरती केले त्या वाळू माफियांचा मोबाईल नंबर सुरेंद्र डोके यांच्या कडे उपलब्ध कसा आहे. पहाटे 4 वा. दरम्यान तो व्यक्ती तेथे कसा आला? वाहन मारुती सुझुकी विटरा बिझा ZDI वाहन क्र. MH 23 AD 4435 ची वेग किती होता? तहसीलदार बीड सुरेंद्र डोके यांनी पोलीस चकलंबा यांना जाण्यापूर्वी कल्पना दिली होती का? अनाधिकृत वाहने नदीत वाळू उपसा करीत असल्याची खबर कोणत्या खबरीने दिली होती.? सुरेंद्र डोके तहसीलदार बीड नितीन जाधव मंडळ अधिकारी यांचे मोबाईल हिस्ट्री तपासने, नितीन जाधव मंडळ अधिकारी यांचे पोस्टमार्टम रिपोर्ट जाहिर करणे.
प्रकरण CID कडे वर्ग न केल्यास मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार
जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेवून प्रकरण CID विभागाकडे सुपूर्द करावे सुरेंद्र डाके यांनी जानिवपूर्वक निष्काळजीपणा करुन एका कर्मचाऱ्याचा जिव घेतला असून त्यांना तपास होईपर्यंत निलंबित करण्यात यावे जेणेकरुन तपासामध्ये अडथडा निर्माण होऊ नये त्यांना पुन्हा कार्यरत करुन घेतल्यास तपासामध्ये अडथडा निर्मान होईल पुरावे नष्ट होतील. प्रकरण CID कडे वर्ग न केल्यास मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल.
मुकरमजान पठाण,
समाजसेवक