तहसीलदार सूर्यकांत डोके गंभीर जखमी
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाईसाठी मोहिमेवर रवाना झालेल्या महसूलच्या पथकातील कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात मंडळ अधिकारी नितीन जाधव हे जागीच ठार झाले, तर तहसीलदार सुरेंद्र डोके हे गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी पहाटेच्या सुमारास गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रोडवरील सावळेश्वर फाटा येथे घडला.
गेवराई तालुक्यातील गोदावरी आणि सिंदफणा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा सुरू आहे. याअवैध वाळू उपसावर कार्यवाही करण्यासाठी प्रशासनाने पथक स्थापन केले आहेत. दरम्यान बीडचे प्रभारी तहसीलदार सुरेंद्र डोके व म्हाळसजवळा (ता.बीड ) चे मंडळ अधिकारी नितीन जाधव यांचे पथक राक्षसभुवन, सावळेश्वर, म्हाळसपिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाईसाठी शनिवारी रात्री गस्त घालत होते.
दरम्यान पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तहसीलदार व मंडळ अधिकारी यांचे वाहन अनियंत्रित होउन सावळेश्वर फाटा येथे रस्त्याची खाली जाऊन झाडाला धडकली. या अपघातात मंडळ अधिकारी नितीन जाधव (39) जागीच ठार झाले. तर तहसीलदार डोके व अन्य एक कर्मचारी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या डोके यांना उपचारासाठी पुण्यात दाखल करण्यात आले आहे. नितीन जाधव यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी रुग्णालयात धाव घेतली. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सर्व परिचित होते.