By MahaTimes ऑनलाइन – मुंबई |
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू लेग स्पिनर शेन वॉर्नचं (Shane Warne) वयाच्या 52 व्या वर्षी निधन झालं आहे. शेन वॉर्नच्या मृत्यूमुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. वॉर्नच्या मृत्यूमुळे फिरकीचा जादूगार हरपल्याची भावना क्रिकेट विश्वातून व्यक्त केली जात आहे. शेन वॉर्नचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ही माहिती फॉक्स क्रिकेटने दिली आहे. वानच्या मंनेजमेंट टीमनेही एक स्टेटमेंट काढून याबाबत माहिती दिल्याचे समजते.
1992 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाच्या वॉर्नने जगातील सर्व फलंदाजांना त्याच्यातालावर नाचवले. शेन वॉर्नने 145 कसोटी आणि 194 एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं होतं. वॉर्नने 145 कसोटी सामन्यांमध्ये 708 विकेट्स घेतल्या होत्या. वॉर्नने 37 वेळा 5 विकेट्स तर 10 वेळा 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. एका कसोटी सामन्यात 128 धावा देऊन 12 विकेट्स ही त्याची सर्वोच्च कामगिरी होती.
तर 194 वनडे मॅचमध्ये त्याने 293 फलंदाजांना माघारी पाठवलं होतं. वॉर्नची वनडेमधील 33 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी होती. शेन वॉर्नने आपल्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सला आयपीएलचं पहिलं विजेतेपद मिळवून दिलं होतं. वॉर्न आयपीएलमध्ये 55 मॅचमध्ये 57 विकेट्स घेतल्या होत्या.
वीरेंद्र सेहवाग यानेही दिला दुजोरा
भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यानेही ट्विविट करून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विश्वास बसत नाही. जगातील दिग्गज फिरकीपटू, सुपर स्टार शेन वॉर्ने जगाचा निरोप घेतला. जीवन खूप नाजूक आहे, परंतु हे समजणे फार कठीण आहे. त्यांचे कुटुंब, मित्र आणि जगभरातील चाहत्यांसाठी माझ्या मनपूर्वक संवेदना.