शिक्षण परिषदेत 56 शाळेच्या 250 शिक्षकांनी नोंदविला सहभाग
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
मुस्लिम समाजातील मुले आर्थिकदृष्या गरीब आहेत. आपण समाजातील मुलांना जीव ओतून शिक्षण दिल्यास मुस्लिम मुलांची शैक्षणिक प्रगती होऊ शकते. तसेच बीड तालुका उर्दू शिक्षण परिषद ही समाजातील शिक्षक व मुलांसाठी प्रेरणादायी ठरू शकते असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी श्री. टेकाळे यांनी केले.
येथील जय हिंद उर्दू माध्यमिक शाळा बीड येथे 3 मार्च रोजी मासिक शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली. याप्रसगी मार्गदर्शन करतांना श्री. टेकाळे बोलत होते. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी समंदर खान, केंद्र प्रमुख फेरोज पठाण, केंद्रीय मुख्याध्यापक शेख मुसा यांनी पूर्णवेळ शाळा सुरू ठेवणे बाबत सुचना दिली. तसेच जादा तासीका घेऊन स्पर्धापरीक्षे मध्ये जास्तीत जास्त मुलांना सहभागी करण्याबाबत शिक्षकांना सागितले.
या शिक्षण परिषदेत इंग्रजी विषय सोप्या भाषेत कसे शिकवावे हे शेख आदील यांनी सोदाहरण स्पष्ट करून सांगितले. तर शेख सलमा मॅडम यांनी कृतीतून विज्ञान विषय शिकविण्याची कला स्पष्ट केली. विषय तज्ज्ञ महंमद ईसहाक सर यांनी तर विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा गणित विषय हसतखेळत कसा शिकवायचा याची ट्रीक समजावुन सांगितली. तर काजी मुशाहेद यांनी उत्कृष्ट संचलना सोबत मुलांमध्ये अध्ययन निष्पत्ती कितपत उतरली आहे हे पडताळून पाहण्याचं सूत्र शिक्षकांना समजून सांगितला. तसेच उत्कृष्ट नमुना पाठ सादर केला.
आलीया मॅडम यांच्या प्रार्थनेने परिषदेची सुरवात करण्यात आली. शिक्षण परिषदेत 56 शाळेच्या 250 शिक्षकांनी सहभाग नोंदविला. दरम्यान उपस्थित मान्यवरांचा शिक्षण परिषदेत सत्कार करण्यात अला. शिक्षण परिषदेस जयहिंद शाळेने जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शेख शकीला मॅडम यांचा सत्कार करण्यात आला.
‘पहली उडान’ या पुस्तकाचे प्रकाशन
यावेळी मान्यवरांच्या हस्ते शेख सलमा मॅडम यांच्या ‘पहली उडान’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व शिक्षकांना पुस्तकाची प्रत भेट देण्यात आली.