16 वर्षांची मुलगीही जखमी
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
शहरात राहणा-या एका 50 वर्षीय महिलेची अज्ञाताने चाकूने वार करून परळीत महिलेची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या घटनेत महिलेची 16 वर्षांची मुलगीही जखमी झाल्याचे समजते.

शहरातील आयशा नगरमध्ये भरदिवसा घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. शेख मदिना शेख मंजीद असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात तिची मुस्कान नावाची मुलगी जखमी झाल्याचे समजते.
हल्लेखोर कोण आहेत, कोणत्या कारणामुळे ही हत्या झाली हे समजू शकले नाही. मात्र, आर्थिक व्यवहारातून ही घटना घडल्याचे व हल्लेखोर माजलगाव तालुक्यातील असल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच परळी पोलीस घटनास्थळी दाखल झाली. परळी तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांत खुनाची ही तिसरी घटना असल्याचे सूत्रांनी सांगितले.