‘योगेश भैय्या तुम आगे बडो, हम तुम्हारे साथ है…’ बीडकरांचा गजर
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
काल साजरा करण्यात आलेल्या योगेश पर्वातील ऐतिहासिक शिवजन्मोत्सवात शिवप्रेमींचा अथांग शिवसागर बीडच्या शिवतीर्थावरअक्षरश: उसळल्याचे विहंगम चित्र पाहायला मिळाले आणि या उसळलेल्या शिवसागरात शिवभक्तांनी भगवा फेटा डोक्यावर बांधून आणि भगवा झेंडा हातात घेऊन आकर्षक विद्युतरोषणाईनात केलेल्या छत्रपतींच्या जयघोषाने वातावरण प्रफुल्लित तथा मनमोहक झाले. डॉ योगेश क्षीरसागरांच्या आवाहनाला मान देऊन बीडवासीयांची जमा झालेली अथांग, अलोट गर्दी डोळ्यांची पारणे फेडून तर गेलीच परंतु याबरोबरच योगेश पर्वाचा दमदार प्रारंभ झाल्याची जाणीव देखील बीडवासियांना झाली.
उच्च विद्याविभूषित आणि आगामी काळातील बीडच्या खंबीर नेतृत्वाचा गोंडस चेहरा असणारं योगेश पर्व किती आनंददायी आणि समाधान देणारं असू शकतं याची शाश्वती बीडकरांना युवा नेते तथा भावी नगराध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी आपल्या कल्पकतेतुन आणि नियोजनामधून साकारलेल्या या शिवजयंतीतुन दिली. म्हणूनच कदाचित बीडकरांच्या अभूतपूर्व उपस्थितून ‘योगेश भैय्या तुम आगे बडो, हम तुम्हारे साथ है…’ असा गजर प्रत्येकाच्या कानावर वारंवार पडत होता.
अठरा पगड समुदायांनी योगेश पर्वातील हा शिवजन्मोत्सव दिवाळीच्या सणासारखा साजरा केला. तर अल्पवधीत बीड शहरातील तरुणाईचं संघटन करण्यात यशस्वी ठरलेल्या डॉ.योगेश क्षीरसागर यांना तरुणाईने आपल्या अंगा-खांद्यावर उचलून विविध गीतांवर ठेका धरला. यंदाच्या ऐतिहासिक शिवजन्मोस्तवतील शिवप्रेमींचा उत्साह पाहून डॉ.योगेश क्षीरसागर देखील तरुणाई सवे मनसोक्त थिरकताना दिसली.
योगेश पर्वातील या शिवजयंतीमध्ये वेळोवेळी होणारी फटाक्यांची आतिषबाजी, विदुत रोषणाईची सजावट, शिवतीर्थावरील प्रत्येकाच्या मनास मोहित करणारी फुलांची अरस, लक्षवेधी कार्यक्रम, अनोख्या स्पर्धांचे आयोजन, याबरोबरच भव्य दिव्य अकल्पित असा लेझर आणि लाईट शो आणि प्रत्येक ठिकाणी असलेले डॉ. योगेश क्षीरसागर यांचे सुस्थितीतील नियोजन पाहून योगेश पार्वतीला ही शिवजयंती शिवप्रेमींसाठी पर्वणीच ठरली असे म्हणावे लागेल. डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली पार पडलेला यंदाचा शिवजन्मोत्सव लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना भारावून गेला.
कोरोना विषाणूच्या थैमानामुळे गेली दोन वर्षे शिवभक्तांना आपल्या राजाच्या जन्मोत्सवाचा मनमुराद आनंद घेता आला नाही. मात्र यावेळी कोरोनाचे सावट दूर झालेले असल्याने गेल्या दोन वर्षांपासून शिवजन्मोत्सवाच्या आनंदाला मुकलेल्या शिवप्रेमींची व्यथा लक्षात घेऊन डॉ योगेश भैय्या क्षीरसागर यांनी यावेळेसची शिवजयंती साजरी करण्यासाठी सर्व सूत्र आपल्या हाती घेतली आणि शिवप्रेमींनाआनंदोत्सव साजरा करण्यात कुठलीच कसर कमी पडू नये म्हणून यंदाचा शिवजन्मोत्सव ऐतिहासिक आणि लोकाभिमुख बनवण्यासाठी दिवसरात्र परिश्रम घेत आपल्या अभिनव संकल्पनेतून बीडवासीयांसाठी विविध उपक्रम राबवत यावेळेसची शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी करत डॉ. योगेश क्षीरसागर यांनी बीड शहरामधील तमाम शिवभक्तांची मने जिंकली.
डॉ योगेश क्षीरसागर यांनी सकाळी आपल्या कुटुंबासह आवग्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या शिवरायांना शिवतीर्थावर वंदन करून शिवजन्मोस्तवाचा प्रारंभ केला. यंदाच्या शिवजयंती निमित्ताने डॉ योगेश क्षीरसागर यांनी उभा केलेल्या ऐतिहासिक भव्य दिव्य लेझर & लाईट शो कार्यक्रमाला समस्त बीडकरांनी मोठया संख्येने उपस्थिती दर्शवून ना भूतो ना भविष्य याप्रमाणे या आनंद सोहळ्याचा मनसोक्त आनंद लुटला. विशेष म्हणजे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आपल्या संकल्पनेतुन साकारलेल्या या लेझर आणि लाईट शो पाहण्याकरिता हजारोंच्या संख्येने पुरुष-महिला, तरुणांनी सहभागी झाल्याचे आनंददायी चित्र पाहायला मिळाले. शिवप्रेमींसाठी योगेश भैय्यां यांनी शिवरायांच्या ऐतिहासिक ठेव्यासोबत आपल्या परिवारासह सेल्फी घेण्यासाठी गडकिल्ले सेल्फी देखावा असणाऱ्या सेल्फी पॉइंटची उभारणी केली होती. गडकिल्ल्यांच्या या सेल्फी पॉईंटवर असंख्य कुटुंबांनी फोटो काढण्याचा मनमुराद आनंद घेतला तर याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचा इतिहास देखील दाखवण्यात आला. सोशल मीडियावरील कलाकारांसाठी भव्य जिल्हास्तरीय इंस्टाग्राम रिल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये शिवाजी महाराज चरित्र गाथा, पोवाडा, मर्दानी खेळ, शिवकालीन वेशभूषा अशा विषयांची स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी रोख 25 हजार रुपयांची पारितोषिके जाहीर करण्यात आली होती. या संपूर्ण स्पर्धा कार्यक्रमांसाठी बीडकारांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला होता.
योगेश पर्वात साजरी करण्यात आलेली शिवजयंती नक्कीच बीडकरांसाठी ऐतिहासिक आणि अविस्मरणीय ठरली. या आनंदोत्सवात बीडवासीयांच्या आनंदास कुठलाही पारावार उरला नव्हता. डॉ. योगेश क्षीरसागर यांनी संपूर्ण बीड शहर शिवमय बनवून टाकले होते किंबहूना प्रत्येकाच्या हृदयात शिवभक्तीचाओसंडून वाहणारा झरा निर्माण केला होता. योगेश पर्वातील शिवजन्मोत्सव इतका अकल्पित, अवर्णीय आणि नयनदीपक असू शकतो तर वर्षातील प्रत्येक सण देखील योगेश पर्वात अशाच पद्धतीने आनंदायी वातावरणात साजरा होईल असा ठाम विश्वास बीडकरांना योगेश पर्वातील या शिवजन्मोस्तवातून मिळाला.