विद्यार्थ्यी व शिक्षकांचा उत्साह पाहून एक वेगळाच आनंद झाला – ना. मुंडे

बीड (प्रतिनिधी) : कोरोना संक्रमण काळातील दीड वर्षाच्या अंतरानंतर सोमवारी राज्यभरात शाळा सुरू करण्यात आल्या. बीड जिल्ह्याच्या टोकवाडी (ता. परळी) येथील जिप शाळेत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वत: उपस्थित राहून विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देउन त्यांचे स्वागत केले. दरम्यान त्यानी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांना ‘वेलकम बॅक टू स्कुल’ म्हटले. विद्यार्थ्यांनी यावळी एका सुरात ‘थ्यांक यु सर’ अशा शब्दात प्रतिसाद दिला. दरम्यान शाळेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.
कोरोनाकालावधी दरम्या जवळपास दीड वर्ष शाळांना ताळे होते. सध्या दुसरी लाट ओसरली असून राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून राज्यात सोमवारपासुन शाळा सुरू झाल्या आहेत. दरम्यान राज्यभरात शिक्षणोत्सव साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे परळी तालुक्यातील टोकवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाउन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
चालू शैक्षणिक वर्षांत आता शाळेला मुहूर्त लागला आहे. शाळा कायम सुरू रहाव्यात म्हणून शाळा प्रबंधन समिती यांनी विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, मास्क सह स्वच्छतेचे धडे द्यावेत. शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाºयांचे लसीकरण करून घ्यावेत अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. दरम्यान पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे, बाजार समितीचे संचालक सूर्यभान मुंडे, डॉ. राजाराम मुंडे, टोकवाडी च्या सरपंच गोदावरी मुंडे, सदस्य तुकाराम काळे, नामदेव मुंडे, सुरेश रोडे, शालेय समितीचे अध्यक्ष मदन काळे, गणेश मुंडे, माधव मुंडे, मुख्याध्यापक श्याम आघाव व सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.
Nice post
Thanks for your comment.