बीड जि.प शिक्षक संघटना समन्वय समिती तर्फे सीईओ अजित पवार, प्रमोद काळे, अजय बहीर यांचा सत्कार
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
जिल्हा परिषद शाळेत माझे शिक्षण झाले. त्यामुळे मला जि. प शाळेतील मुलांचे शिक्षण व शिक्षकाबद्दल आस्था आहे. जि.प.च्या शाळेत इतर शाळेपेक्षा चांगली गुणवत्ता आली पाहिजे असे मत जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी व्यक्त केले.
बीड जिल्हा परिषद शिक्षक संघटना समन्वय समितीने गुरूवारी (दि.17) मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.बीड मा.अजित पवार साहेब यांची शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर भेट घेतली. या वेळी उप मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, शिक्षणाधिकारी (प्रा.) अजय बहीर उपस्थित होते. या वेळी शिक्षकांचे प्रश्न शेख मुसा, राजेंद्र खेडकर, सुनील कुर्लेकर, दिलीप खाडे, गौतम जाधव, बाळराजे तळेकर, काजी मुशाहेद यांनी सविस्तर मांडले.
जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे सांभाळल्यानंतर अजित पवार साहेब यांनी ग्रेड मुख्याध्यापक पदोन्नती, शिक्षण विस्तार अधिकारी पदोन्नती, करार तत्त्वावरील केंद्र प्रमुख पदभार, चटोपाध्याय आदेश, मेडिकल बीले, स्थाईत्वाचा लाभ, हिन्दी, मराठी सुट आदेश तथा कर्मचाºयाच्या आकस्मिक मृत्यूनंतर संकटात सापडलेल्या कुटुंबाच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देने इत्यादी कामे तात्काळ निकाली काढली आहेत.
तसेच शिक्षकाची काही प्रश्न प्रलंबित आहेत त्यामध्ये बीडीएस तात्काळ चालु करु न भनिनी देयके, पेन्शन, उपदान, गटविमा वितरीत करणे, निवडश्रेणी आदेश निर्गिमत करणे, चटोपाध्याय चा दुसरा टप्पा निकाली काढणे, अभावित केंद्र प्रमुख पदोन्नती देणे, प्राथमिक पदवीधर विज्ञान,गणित विषयाच्या रिक्त पदे भरणे, सुट्टीत कोवीड मध्ये काम केलेल्या शिक्षकांना वाहन भत्ता देणे, उर्दू माध्यमाचे रिक्त पदे शासनास कळविणे व भरणे तथा वित्त विभागाचे लेखाधिकारी जव्हेरी विनाकारण शिक्षकांची मेडीकल, भनिनी, उपदान देयकात ञुटी काढणे, तसेच सेवा पडताळणी मध्ये विनाकारण ञुटी काढून शिक्षकांची अडवणूक करतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.
शिक्षकांचे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न अल्प कालावधितच मार्गी लावले याबद्दल मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार साहेब यांच्यासह उप मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, शिक्षणाधिकारी (प्रा.) अजय बहीर यांचा गुरूवारी बीड जिल्हा परिषद शिक्षक संघटना समन्वय समितीने आभार व्यक्त करीत सत्कार केला. या वेळी संघटनेचे सुमंत खांडे, आर.डी. जाधव, हावळे सर, सखाराम शिंदे, अरूण घुले, बप्पासाहेब देवगुडे, योगेश सोळसे, राहुल उडाळे, सुरेंद्र गोल्हार, जफर खान, अन्वर खान, उस्मान खान, एन.के. वाघमारे, प्रमोद ससाणे, बाळासाहेब आहिरे, प्रवीण सानप, अलीम मोमीन आदि उपस्थित होते.