डॉ.संतोष मुंडे व युवा नेते सुंदर गित्ते यांचा आदर्श उपक्रम
गावातच तपासणी व लगेच श्रवणयंत्रांचे वाटप
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे व युवा नेते सुंदर गित्ते यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (13 फेब्रुवारी ) रोजी गावातील नागरिकांची कानाची कॉम्प्युटराईजड मशिनने मोफत तपासणी व श्रवणयंत्राचे मोफत वाटप शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून यावेळी बीड येथील डॉ.जयशंकर तामसेकर व डॉ.मोहन मुळे यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती नंदागौळ ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते व एनसीपी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे व युवा नेते सुंदर गित्ते या दोघांच्या माध्यमातून नंदागौळ येथे वर्ष 2012 पासून आतापर्यंत अनेक आरोग्य तपासणी विषयक शिबिरे, मोफत तपासणी तसेच अनेक श्रवणयंत्रांचे यापूर्वी वाटप केलेले आहे, परंतु सध्या अनेक नागरिकांची मागणी येत असल्याने गावातील नागरिकाना गावातच तपासणी व जाग्यावर श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात येणार आहे.
कर्णबधिर असलेल्या नागरिकांच्या कानाची प्रत्येकी 500 रुपयांची कॉम्प्युटराईजड मशिनने मोफत तपासणी करण्यात येणार आहे, यासाठी रविवार दि 13 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 8 ते 12 या वेळेत गावातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत, नंदागौळ च्या वतीने करण्यात आले आहे.