जिल्हाधिकाऱ्यांचे शिक्षणविभागाला निर्देश
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
जिल्हयातील शाळा सोमवारपासून गजबजणार आहेत. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी 14 फेब्रुवारीपासून जिल्हयातील पहिलीपासून सर्वच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाला निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता सोमवारपासून जिल्हयातील सर्वच शाळेची घंटा वाजणार आहे.
राज्यात कोरोना मुळे बंद करण्यात आलेल्या शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. यानंतर ही बीड जिल्ह्यात केवळ 8 वी ते 12 वीं पर्यंतच्या शाळा दोन टप्प्यात सुरू करण्यात आल्या. आता सोमवारपासून तिसºया टप्प्यात जिल्हयातील पहिलीपासूनच्या सर्वच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी निर्देश दिल्याने शिक्षण विभागाने संबंधितांना सूचना देण्याची तयारी सुरु केली आहे.
कोरोनामुळे मागच्या 2 वर्षात शाळा सर्वाधिक काळ बंदच आहेत. दुसरी लाट ओसरल्यानंतर दिवाळीच्या सुमारास काही काळ शाळा सुरु झाल्या होत्या, मात्र पुन्हा तिसऱ्या लाटेत कोरोना रु ग्ण वाढत असल्याने शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र शाळा सुरु करण्यासाठी पालकांचा दबाव वाढल्यानंतर राज्य सरकारने शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले होते. त्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी शाळा सुरु झाल्या. मात्र बीड जिल्हयात जिल्हाधिकाऱ्यांनी सुरु वातीला पहिल्या टप्प्यात 10 वी व 12 वी. दुसऱ्यांटप्प्यात 8 वी, 9 वी व 11 वी च्या शाळा सुरू केल्या होत्या आता तिसऱ्या टप्प्यात पहली ते सर्व शाळा सुरू करण्यास परवानगी दिली दिली असून तसे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत. यानिर्णयामुळे विद्यार्थी व पालकवर्ग उत्साहित झाला आहे