By MahaTimes ऑनलाइन – बीड |
एक्सिस ऑर्थोपेडिक हॉस्पिटल चा प्रथम वर्धापन दिन शुक्रवारी (दि.11) रोजी साजरा करण्यात येणार असुन दुपारी 3 वा. अद्यावत आंतरूग्ण विभाग व ऑपरेशन थिएटर चे उद्घाटन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे अशी माहिती हॉस्पिटल चे संचालक तथा प्रसिध्द ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सय्यद अब्दुल हसीब यांनी दिली.
या शुभारंभ कार्यक्रमास आ.संदीप क्षीरसागर, नगराध्यक्ष, डॉ.भारतभूषणजी क्षीरसागर, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार बदामराव पंडित, माजी आमदार सुनिलदादा धांडे, माजी आमदार सिराज देशमुख माजी आमदार राजेंद्र जगताप, माजी आमदार उषाताई दराडे, वरिष्ठ समाजसेवक मोईन मास्टर, मा.खालेक पेंटर, मा. योगेश क्षीरसागर, मा.फारु ख पटेल आदिंची विशेष उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी मुफ्ती मोहम्मद आरेफ साहब, सय्यद नजीब साहब, मौलाना बाकी, मौलाना जाकेर सिद्दीकी साहब यांचे शुभाशिर्वाद लाभणार आहेत.
रूग्णसेवेला वाहुन घेतलेल्या व अल्पावधीतच नावारूपास आलेल्या एक्सिस ऑर्थोपेडिक हॉस्पिटल चा प्रथम वर्धापन दिनानिम्मित अद्यावत आंतरूग्ण विभाग व ऑपरेशन थिएटर चे शुभारंभ या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. सय्यद अब्दुल हसीब यांनी केले आहे.
फेब्रुवारी 2021 मध्ये डॉ. सय्यद अब्दुल हसीब यांनी हॉस्पिटलची मुहूर्तमेढ रोवली
डॉ. सय्यद अब्दुल हसीब यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे, मुंबई, औरंगाबाद सारख्या मेट्रोसिटीत सेवा बजावली. विविध नामांकित हॉस्पिटल मध्ये तगडा अनुभव घेतल्यानंतर मोठ्या शहरात दवाखाना थाटण्याऐवजी बीड शहर व जिल्ह्यातील जनतेला सेवा देण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी बीड शहरातील एक नामांकित हॉस्पिटल मध्ये ऑर्थोपेडिक कन्सल्टंट म्हणून आरोग्य सेवा दिली. मागील वर्षी डॉ. सय्यद अब्दुल हसीब शहरातील नर्सरी रोड येथील अपेक्स टॉवर येथे फेब्रुवारी 2021 मध्ये एक्सिस ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मुहूर्तमेढ रोवली. अद्यावत व सर्व सोयिंनीयुक्त हॉस्पिटल सुरू करून त्यांनी कोरोना संक्रमण काळात संक्रमणाचा धोका असतांनाही कोविड-19 नियमांचे तंतोतंत पालन करीत 24 तास रूग्णांना सेवा दिली.