महिलांनी मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहिम राष्ट्रपतींना पाठविले निवेदन
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
कर्नाटकात हिजाब च्या समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद बीड मध्ये उमटत आहेत. गुरूवारी सामाजिक कार्यकर्त्या अॅड. हेमाताई पिंपळे यांनी हिजाब च्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चात बुरखा परिधान करून सहभाग नोंदवला. ‘वी सपोर्ट हिजाब’ हे अनोखे आंदोलन सोशल मिडीयावर वायरल होत आहे.
मुस्लिम विद्यार्थींनींच्या हिजाब, बुरखा घालवरून कर्नाटक राज्यात गेल्या कांही दिवसापासुन वाद सुरू आहे. हा वाद कोर्टात गेला आहे. हिजाबच्या स्वागत-विरोध चे आंदोलनाचे लोन बीड सह राज्याच्या अनेक जिल्ह्यात पोहचले आहे. बीड शहरात दोन दिवसांपूर्वी हिजाब च्या समर्थनार्थ शहरात बैनर झळकले होते. तर आज महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी हिजाब चे समर्थन करीत शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला. या मोर्चातअनेक महिला पारंपारिक बुरखा परिधान करून सामिल झाल्या होत्या.
दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अॅड. हेमाताई पिंपळे यांनी केवल मोर्चा सामिल होत हिजाब चे समर्थन केले नाही तर त्यांनी इतर मुस्लिम महिलांसोबत स्वत: बुरखा परिधान करून आंदोलनात सहभागी देखील झाल्या. हिजाबचे खुलेआम समर्थन केले. मुस्लिम महिलांच्या हिजाब आणि बुरख्याच्या समर्थनार्थ बहुतांश लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. हिजाबच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत. गुरूवारी बीड मध्ये झालेल्या आंदोलनात अॅड. हेमा ताई पिंपळे, मंगल जगताप, शेख गुलरु खजहीन, राणी ताई, पुनम वाघमारे, जयश्री साळवे, स्नेहा खंडागळे आदिंसह असंख्य महिलांनी सहभाग नोंदवला. यावेळी या महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी हिजाबच्या समर्थनार्थ आपली मते मांडली.
काय म्हटलयं निवेदनात…
महामहिम राष्ट्रपति यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, देश हा संविधानानुसार चालत असून संविधानाने सर्वांना धर्म आचरणाचा अधिकार प्रदान केलेला आहे. हिजाब परिधान करणे इस्लामी संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे, पवित्र कुराण च्या आयत क्र मांक 24.31 आणि 24.33 वर हिजाब बाबत आदेश आहेत, हिजाब पेहराव करणे संविधानिक अधिकार असून संविधानाच्या अनुच्छेद 19, (1) च्या अंतर्गत मूलभूत अधिकार आहे, तसेच हा पर्सनल लॉ सुध्दा आहे. ज्याला सुप्रीम कोर्टाने अनुच्छेद 21 च्या अंतर्गत मान्यता सुदधा दिलेली आहे. अनेक वर्षापासून विद्यार्थ्यींनी या हिजाब पेहराव करून कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते व घेत आहेत, परंतु मागील काही दिवसापासून कर्नाटक राज्यात उड़पी जिल्ह्यातील कुंडापूर येथील सरकारी कॉलेजमध्ये मुस्लिम मुलींना शाळेमध्ये हिजाब घालून प्रवेश करण्यासाठी मज्जाव केला जात आहे. या घटनेतून राजकारण शिक्षणाच्या दारापर्यंत आलेले आहे जे अतिशय निंदनीय आहे, राज्यातील व केंद्रातील बिजीपी सरकार हे जाणून बुजून या घटनेला धर्मवादाचा रंग देत खतपाणी घालत आहेत. असे दिसन येत आहे. संविधानिक मौलिक अधिकाराचे जतन करत मुस्लिम मुलींनी हिजाब घालण्याची परवानगी दयावी अशी मागणी रेहानाअनिस पठाण यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.