By MahaTimes ऑनलाइन – बीड |
अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र बीड यांच्या सहभागाने व फूड हेल्थ अँड एनवोर्मेन्ट मॅनेजमेंट सोलुशन यांच्या वतीने प्रशिक्षक प्रियंका सूर्यवंशी व नर्सिम्हां भट व कॅट या व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष सोहनी तसेच बीड शहराध्यक्ष विनोद पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (दि.8 रोजी) शहरातील एमआयडीसी भागातील वैष्णव पॅलेस येथे बीड जिल्ह्यातील अन्न उत्पादक व वितरकांचे एक दिवसीय प्रशीक्षण प्रशिक्षण उत्साहात पार पडले. करण्यात आले अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त इम्रान हाश्मी, एस.बी.कोडगिरे व बीड्चे अन्नसुरक्षा अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उत्कृष्ट पवनकुमार धूत (अन्न सुरक्षा मित्र) व बीड शहर बीड जिल्हा मिठाई संघटना अध्यक्ष किशोर शर्मा उपाध्यक्ष जितेश पडधरिया यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी स्वीटअँड फरसाण, बेकरी, फ्लोअरमिल ऑइल रीपकिंग घरगुती बचत गट उत्पादक व वितरकांना अन्न पदार्थ हाताळन्याचे प्रशिक्षण देण्यात आले. अन्नसुरक्षा कायदा व मानदे 2006 नियमानुसार हाताळणी कशी करायची याचे प्रशिक्षण मंगळवारी झालेल्या प्रशिक्षणा दरम्यान बीड जिह्यातील व शहरातील अन्न उत्पादक व वितरक व्यापार्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणात अन्न आस्थापना अन्न परवाना अटी व शर्ती याबाबत इत्यंभूत माहिती देण्यात आली व त्यानुसार व्यवसायात घ्यावयाची काळजी याबाबत महेंद्र गायकवाड अन्नसुरक्षा अधिकारी बीड यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणानंतर उपस्थित व्यापारी उत्पादकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदरील प्रशिक्षणामध्ये जिल्हाभरातील व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.