शाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आदर्श पालक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
वडमाऊली विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री शरद गदळे, सचिव श्रीमती बाळुताई गदळे, इप्पर मॅडम व शाम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वतीने शुक्रवारी शाळेतील माजी विद्यार्थी डॉ. गोरक्षनाथ शिवाजी मोरे, घाटी हॉस्पिटल औरंगाबाद त्यांचे बंधू कृष्णा शिवाजी मोरे यांचा नीट परीक्षेत 549 गुण मिळवून एम.बी.बी.एस साठी एम.आय.टी लातूर या ठिकाणी प्रवेश मिळाल्याबद्दल व ग्रामीण भागात राहून दोन्ही मुलांना एम.बी.बी.एस पर्यंत पोहचणारे पालक शिवाजी मोरे यांचा सत्कार करण्यात आला शाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये बाहेरगावाहून बरेचसे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात त्यामध्ये मौजे हरगडवाडी हे गाव अगदी 40 ते 50 लोक वस्ती असणारे गाव आहे.
या गावातील जवळपास सर्वच ऊस तोडणीसाठी मजूर म्हणून पश्चिम महाराष्ट्र मध्ये जातात कारण पोट भरण्यासाठी पुरेशी शेती, पाणी नसल्यामुळे व जमीन डोंगराळ भागातील असल्यामुळे पोट भरण्यासाठी तोडल्याशिवाय पर्याय नाही ही सत्य परिस्थिती आहे त्यामध्ये श्री शिवाजी मोरे हे सुद्धा ऊस तोड कामगार आहेत त्यांनी दोन मुलांना प्राथमिक शिक्षण वडमाऊली देवी येथील वस्ती शाळेमध्ये व पुढील शिक्षण घेण्यासाठी गावापासून जवळच असलेल्या श्याम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेतला कारण मुलांना बाहेर गावी ठेवण्याची इच्छा असून नव्हती म्हणून गावाजवळ असलेल्या शाळेत प्रवेश दिला पहिला मुलगा मोरे गोरक्षनाथ शिवाजी हा पाचवी ते दहावी हा प्रवास करत असताना शांत संयमी कष्टाळू परिस्थितीची जाण असणारा विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत पहिला क्रमांक येण्याचा मान मिळवला त्यानंतर पुढील शिक्षणासाठी लातूरला प्रवेश घेऊन नीट परीक्षेत चांगले मार्क घेऊन एमबीबीएसला घाटी हॉस्पिटल औरंगाबाद या ठिकाणी प्रवेश मिळवला आणि पदवी पूर्ण केली.
आपल्या भावाचा आदर्श समोर ठेवून श्री कृष्णा शिवाजी मोरे यांनी सुद्धा विद्यालयातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी लातूर येथे राहून नीट परीक्षेमध्ये 549 गुण मिळवून एम बी बी एस साठी एम आय टी वैद्यकीय महाविद्यालय लातूर या ठिकाणी प्रवेश मिळविला आशा या गुणवंत विद्यार्थ्यांचे व आदर्श पालकांचा सत्कार श्याम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दहिफळ वड तालुका केज या ठिकाणी वडमाऊली विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव श्रीमती बाळू ताई गदळे संस्थेचे उपाध्यक्ष शरद बप्पा गदळे प्राचार्या इप्पर मॅडम तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. सूत्र संचालन आय.डी. मॅडम यांनी केले तर सर्वांचे आभार ठोंबरे डी.बी सरांनी मानले.