समाजातील थोर विचारवंत, धर्मगुरूंचे मार्गदर्शन लाभणार
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
ऑल इंडिया पयाम-ए-इंसानियत फोरमच्या वतीने सोमवारी बीड येथे मानवतेचा संदेश या विषयावर शहरातील तकिया मस्जीद येथे जिल्हास्तरीय ‘जलसा-ए-आम’ (jalsa-e-aam) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मानवतेचा संदेश देण्यासाठी सर्वधर्मिय बांधवांसाठी आयोजित हा कार्यक्रम हजरत मौलाना शेख अहेमद साहब (इमाम व खतीब रहमतीया मस्जीद) यांचे मार्गदर्शनाखाली व मुफ्ती अब्दुल्लाह कासमी साहब (जिलाध्यक्ष, जमियत उलेमा-ए-हिंद, बीड) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असून या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून हजरत मौलाना जुनैद फारूकी नदवी (विभागीय अध्यक्ष, ऑल इंडिया पयाम-ए-इंसानियत फोरम) हे उपस्थित राहणार आहेत. समाजातील थोर विचारवंत, धर्मगुरूंचे मार्गदर्शन लाभणार आहे.
याप्रसंगी हजरत मौलाना मुफ्ती आरिफ साहब, हजरत मौलाना इलियास कासबी साहब, हजरत मौलाना हाफीज जाकीर साहब, हजरत मौलाना मुप्ती अतिक साहब, हजरत मौलाना मुफ्ती शब्बीर अहेमद काशफी नदवी साहब, हजरत मौलाना अब्दुल रहीम जाहीद साहब यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे.
शहरातील तकिया मस्जीद (नर्सरी रोड) येथे 7 फेब्रुवारी सायंकाळी ( मगरीब नमाज नंतर ) आयोजित कार्यक्रम सर्वांसाठी खुला असुन याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन आयोजक मोहम्मद सईद, मुफ्ती शब्बीर अहेमद काशफी नदवी सहित पयाम-ए-इन्सानियतच्या स्थानीय पदाधिकारी व सहकाºयानी केले आहे.