गढी महाविद्यालयात ‘भाषा वाङमय मंडळाचे थाटात उद्घाटन
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला व विज्ञान महाविद्यालय शिवाजीनगर, गढी व एकता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला महाविद्यालय, बिडकीन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजीनगर, गढी येथे 31जानेवारी रोजी हिंदी, मराठी, इंग्रजी विभागाच्यावतीने “भाषा वाङमय मंडळाचे उद्घाटन” मोठ्या थाटात संपन्न झाले.

या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लोकसेवा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.लियाकत शेख हे होते. तर प्रमुख वक्ता म्हणून महिला महाविद्यालय औरंगाबाद येथील मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. जितेंद्र शेजवळ होते, प्रमुख अतिथी म्हणून महिला महाविद्यालयातिल इंग्रजी विभागाध्यक्षा प्रा.डॉ. तबस्सुम ईनामदार मॅडम ह्या होत्या तर स्वागत अध्यक्ष म्हणून कला महाविद्यालय बिडकीन येथील प्राचार्य डॉ. नितीन आहेर हे उपस्थित होते. तर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सदाशिव सरकटे हे होते.
उदघाटक म्हणून बोलत असताना डॉ. शेख यांनी वाड़्मय हे समाजाचा आरसा असतो आसे प्रतिपादित केले. काळ कसाही असो त्याची उकल करण्याची प्रतिभा जवळ असावी लागते असे मत मांडले. प्रमुख वक्ता म्हणून महिला महाविद्यालय औरंगाबाद येथिल मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. जितेंद्र शेजवळ होते. पुढे बोलतांना ते असे म्हणाले की महाविद्यालयीन जीवनात वाड्मय उदघाटनाचे फार महत्त्व आहे. कारण त्या मुळे विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला चालना देण्यास मदत होते.
प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ. ईनामदार यांनी महाविद्यालयीन युवकांनी आपली संवेदनशीलता व प्रतिभेचा विचार करुन लेखन व संवाद कौशल्य विकसित करण्याची गरज आहे.असे मत मांडले.
अध्यक्षीय समारोप करतांना प्राचार्य डॉ सदाशिव सरकटे यांनी साहित्य निर्मिती प्रक्रिया व प्रयोजन याबाबत सविस्तर चर्चा केली. कोरोनासारख्या वैश्विक समस्येला धीराने सामोरे जाऊन युवकांनी आपली जबाबदारी समजून घेणे आवश्यक आहे. असे मत डॉ. सदाशिव सरकटे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख व संयोजक डॉ.संतोषकुमार यशवंतकर यांनी केले तर प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख व संयोजक डॉ.मुखत्यार शेख यांनी केले तर मराठी विभागगाचे सदस्य व संयोजक प्रा.रमेश रिंगणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमास हिंदी, मराठी व इंग्रजी विभागाचे प्राध्यापक महाविद्यालयातील विभिन्न विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी आभासी पद्धतीने बहुसंख्येने उपस्थित होते.