पालकांचा निरोप हे माझे भाग्य – मा. शिक्षणअधिकारी अजय बहीर
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
जि.प.केंद्र अशोकनगर बीड येथे शिक्षण परिषदेत 100 दिवस वाचन अभियान, ईमेल चा वापर, दिव्यांग विद्यार्थी मुल्यमापन,टॅग या विषयावर वर्षा कोरडे, प्रमोद ससाणे,सखाराम शिंदे यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर शिक्षण परिषदेत सेवानिवृत्त शिक्षक श्रीमती नसीम सुलताना जि.प.पेठबीड, मागदे धर्मराज जि.प.गाधीनगर, मोमीन मसीयोद्दीन जि.प.मोमीनपूरा व अभिमान बहीर शिक्षण विस्तार अधिकारी बीड यांचा निरोप समारंभ मा. शिक्षणअधिकारी अजय बहीर, गटशिक्षण अधिकारी मा.श्रीराम टेकाळे, शिविअ माटे, केंद्र प्रमुख फेरोज पठाण, केंद्रीय मुख्याध्यापक शेख मुसा यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या वेळी अजय बहीर शिक्षण अधिकारी यांनी सेवानिवृत्त शिक्षकांनी शैक्षणिक सेवेचा वसा जोपासून समाजसेवा करावी. माझ्या पालकांचा निरोप समारंभ माझ्या हस्ते संपन्न होते हे माझे भाग्य आहे. इतर शिक्षकांनी नियमीत शैक्षणिक कार्य करावे. असे प्रतिपादन केले. गशिअ टेकाळे, शिविअ माटे, केंद्र प्रमुख फेरोज पठाण यांनी मार्गदर्शन केले.सत्कारास भावनिक उत्तर सेवानिवृत्त शिक्षकांनी दिले. तसेच त्यांच्या कार्याची ओळख अनेकांनी भाषणातून वेक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुअ शेख मुसा यांनी तर बहारदार सुञसंचलन आशा भारती, वर्षा कोरडे यांनी तर आभार काव्यरूपी मनिषा मोराळे यांनी वेक्त केले.

सदर कार्यक्रमास केंद्रातील सर्व शिक्षक तसेच मुअ शेख रशीद, फुलझळके,केंद्र प्रमुख रशीद खान, मुमताज हाश्मी, एजाज बेग, हसनात मिर्झा, काजी मुशाहेद, सुमंत खान्डे, सुमन जोगदंड तथा सेवानिवृत्त केंद्र प्रमुख खान करीमा यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. उपस्थिती अधिकाऱ्यांच्या हस्ते सुंदर शाळा पुरस्कार काळेनगर,सय्यद अलीनगर,व रामतीर्थकुन्ड या शाळेला देण्यात आला.शेवटीभोजनाच्या अस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.