माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नांना यश
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना संशोधन व विकास अंतर्गत बीड जिल्ह्यातील बीड आणि शिरूर तालुक्यातील 31 रस्त्यांच्या कामांना दिनांक 8 जुलै 2019 रोजी शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केल्यानंतर, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था औरंगाबाद विभागामार्फत दि. 9 सप्टेंबर 19 ला बीड आणि शिरूर तालुक्यासाठी 31 रस्त्यांच्या कामांसाठी 70.76 कोटीच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. पुढे कोरोना संकट आणि सरकार बदलल्यामुळे ज्या कामांचे कार्यारंभ आदेश झालेले नाहीत ती कामे पुढे रद्द करण्याचे शासनाने ठरविले होते पण माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून या सर्व कामाचे कार्यारंभ आदेश आता निघाले असून त्यातील काही कामांना सुरुवात हि झाली आहे.

राज्यपाल यांनी ऑक्टोबर 2014 च्या विशेष अधिवेशनात केलेल्या अभिभाषणात राज्यातील सर्व गावे पक्क्या रस्त्यांनी जोडण्यात येतील असा उल्लेख केला होता. त्यास अनुसरून ग्रामीण भागातील न जोडलेली गावे लोकवस्त्या रस्तयाद्वारे जोडण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून केंद्रशासनाच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरू करण्यात आली. या योजनेतून नवीन रस्ते जोडण्यासाठी, अस्तित्वातील दुरावस्था झालेल्या, इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गाच्या दर्जोन्नती साठी महाराष्ट्र राज्याला वाढीव उद्दिष्टे देण्यात आली होती.
माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर यांचे शहरी भागा बरोबर ग्रामीण भागांचा दळणवळणासाठी सुद्धा विशेष लक्ष असल्या कारणाने त्यांनी 2019 मध्ये शिरूर आणि बीड तालुक्यातील प्रमुख गरजेचे 31 रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून प्रस्तावित केले होते. पुढे सरकार बदलल्यामुळे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे बजेटची अनुपलब्धता होत असल्यामुळे शासन हे रस्ते रद्द करण्याच्या मार्गावर होते. पण या रस्त्यांची आवश्यक असलेली गरज माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांना वारंवार विनंती केल्यामुळे या रस्त्यांचे कार्यारंभ आदेश आता निघाले आहेत ते पुढीलप्रमाणे एस.एच. 56 ते रत्नागिरी रोड, इतर जिल्हा मार्ग 49 ते मांडवखेल रोड, मुख्य जिल्हा मार्ग 32 ते कारेगव्हाण रोड या तीन रस्त्यासाठी 341.34 लक्ष, एस.एच. 56 ते खर्डेवाडी रोड 440.99 लक्ष, इतर जिल्हा मार्ग 47 ते मांडवजाळी भाळवणी रोड 280.84 लक्ष, एस.एच. 56 ते खंडाळा ढालेवस्ती रोड 183.76 लक्ष, एन.एच. 211 ते धनगरवाडी रोड आणि इतर जिल्हा मार्ग 115 ते फुकेवाडी रोड या दोन कामासाठी 333.14 लक्ष, एस.एच. 55 ते नागापूर खुर्द रोड, मुख्य राज्यमार्ग 16 ते फड वस्ती आणि मुख्य राज्य मार्ग शिवनी ते भिल्ल वस्ती रस्ता या तीन कामासाठी 420.25 लक्ष, वंजारवाडी ते भगवान नगर, आहेर धानोरा ते राम मंदिर, इंगोले वस्ती वरवटी रस्ता आणि मुख्य राज्य रस्ता 16 ते वंजारवाडी चर्हाटा रस्ता या तीन कामासाठी 624.42 लक्ष, तांदळवाडी ते सिरसाठ वस्ती, एस.एच. 211 ते कोळवाडी आणि एस.एच. 211 ते वानगाव पैसावस्ती या तीन कामासाठी 362.70 लक्ष, बोरखेड ते गोलंग्री आणि मुख्य रस्ता 28 ते शहाबाजपूर सानप वस्ती रस्त्यासाठी 538 लक्ष, एन.एच. 211 ते आहेर वडगाव काठवडा 425.23 लक्ष, खांबा लिंबा पौंडुळ ते नारायणगड केतुरा 459.06 लक्ष, एस.एच. 55 ते बोरदेवी रस्ता आणि मुख्य जिल्हा मार्ग 18 ते किन्हीपाई रस्ता 283.79 लक्ष, एस.एच. 222 सांडरवन ते पिंपळादेवी रस्ता 371.25 लक्ष, पाडळी ते आनंदगाव 370.24 लक्ष, वारणी ते मांगोबा वस्ती रस्ता, बांगरवाडी ते गणेशवाडी रस्ता आणि एस.एच. 59 ते बडेवाडी रस्ता या तीन कामासाठी 462.82 लक्ष, मुख्य जिल्हा मार्ग 13 ते दत्तनगर रोड 411.18 लक्ष, मुख्य जिल्हा मार्ग 28 ते गाजीपुर 284.04 लक्ष, मुख्य राज्य रस्ता 16 ते शिरापुर धुमाळ आनंदवाडी काकडहिरा 390.70 लक्ष या सर्व रस्त्यांची कामे दर्जेदार करावीत अशा सूचना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिल्या आहेत.