By MahaTimes ऑनलाइन – बीड |
प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाभरात उत्साहाचे वातावरण होते. शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालय व संस्थेत ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. महाटाइम्स टीम ने घेतलेला हा आढावा.
इंदिरा गांधी मेमोरियल उर्दू हायस्कूल येथे डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेद्वारा संचालित इंदिरा गांधी मेमोरियल उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बालेपीर बीड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त नगरपरिषद बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. देशाच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था इंदिरा गांधी मेमोरियल उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे बीड नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते भारतमाता आणि संविधान पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर पीपल्स एज्युकेशनसोसायटी या संस्थेचे सचिव मुश्ताक अन्सारी यांच्या हस्ते प्रमुख अतिथी डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रमुख पाहुणे माजी उपनगराध्यक्ष फारुक पटेल, नसीर अन्सारी, नसीम इनामदार, एम.आय.एम. चे जिल्हाध्यक्ष अॅड. शेख शफिक, सभापती खुर्शीद आलम, जयतुल्लाह खान, शेख मतीन, लक खान, नगरसेवक जलील पठाण, खमर मिस्त्री, नईमुद्दीन गुत्तेदार, अजीज अन्सारी, मुक्तार अन्सारी या सर्व पाहुण्यांचे इंदिरा गांधी मेमोरियल उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सज्जाद अहमद खान आणि पीपल्स उर्दू प्रायमरी शाळेचे मुख्याध्यापक सय्यद अतीक अहमद यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील अनेक मान्यवर पालक उपस्थित होते.
मदरसा मजाहिरुल उलूम येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त नगराध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

बीड शहरातील मदरसा मजाहिरुल उलूम व मदरसा हजरत फातेमतु -ज्जोहरा लिलबनात येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त बीड नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील मदरसा मजाहिरुल उलूम व मदरसा हजरत फातेमतु – ज्जोहरा लिलबनात येथे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्व पटवून देत शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नगराध्यक्षांनी मदरसा मजाहिरुल उलूम मधील विद्यार्थ्यांना उत्तमरीत्या शैक्षणिक व अध्यात्मिक शिक्षण देत असल्याबद्दल सर्व स्टाफ चे कौतुक केले व भविष्यात या ठिकाणी नक्कीच महाविद्यालय उभे करावे जेणे करून गोर गरीब मुलां- मुलींना उत्तम दर्जाचे शिक्षण घेता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांना बक्षीसाचे वाटप करण्यात आले.
मिल्लिया महाविद्यालय बीड

येथील मिल्लिया महाविद्यालयात 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या सचिव श्रीमती खान सबिहा बेगम यांच्या शुभहस्ते सकाळी 07: 45 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी मिल्लिया कला,विज्ञान आणि व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहम्मद इलियास फाजील, उपप्राचार्य डॉ. सय्यद हनीफ, उपप्राचार्य डॉ. हुसैनी एस. एस. आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अब्दुल सत्तार, उपमुख्याध्यापक सय्यद खिजर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शेरखान, सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती.
जि.प.केंद्र अशोकनगर बीड

आज 26 जानेवारी रोजी जि.प.केंद्र अशोकनगर बीड येथे 73 वा प्रजासत्ताक दिनी महात्मा गांधी,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार नगरसेवक संजय उढाण, माजी सभापति न.प.बीड खुर्शीद आलम, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष शेख उस्मान केंद्र प्रमुख फेरोज पठाण, मुख्याध्यापक देवगावकर तथ केंद्रीय मुख्याध्यापक शेख मुसा समाजसेवक यांनी शेख वजीर, जिन्स ॲटो संघटनेचे शेख बाबुभाई या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळीशाळेचा स्टाफ व काही मुले उपस्थित होते.
लोखंडी सावरगावात प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा
अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथे 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. दरम्यान ठीक ठिकाणी भारतीय संविधानाचे वाचन केले गेले.

येथील ग्रामपंचायत कार्यालयात व डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात प्रशासक ए एम सावध,जय भवानी विद्यालयात
मुख्याध्यापक राम शेळके, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक ए बी काळे, वसुंधरा महाविद्यालयात हरिभाऊ
शेळके, आधारभूत ग्रामीण पशुवैद्यकीय दवाखान्यात शेख मुस्तफा, सेवा सहकारी सोसायटी कार्यालयात कुमार देशमुख आदी मान्यवरांच्या हस्ते कोरोणाचे नियम पाळून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मनोज देशमुख यांनी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन
केले. कार्यक्रमाला ग्राम विकास अधिकारी एस बी शिंदे, माजी सरपंच राजपाल देशमुख,भगवानराव मुळे, राजाभाऊ
राऊत, विकास माचवे,शेख दस्तगीर, मुनीर पठाण, कल्याणराव गायकवाड, ज्ञानोबा माचवे, सूर्यकांत नांदवटे, संघरक्षक बनसोडे, पिंटू बनसोडे, युवराज मुळे, लायक शेख, आरोग्य सेविका एस एन कोलपुसे, अंगणवाडी कार्यकर्त्या, ग्रामपंचायत कर्मचारी सह ग्रामस्थ उपस्थित होते.