सर्वसामान्य माणसाच्या आर्थिक उन्नतीसाठी एकजुटीने काम करू – धनंजय मुंडे
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
मागील दोन वर्षांच्या कालखंडात जिल्ह्याने कोरोनासह अभूतपूर्व पाऊस व त्यामुळेआलेला महापूर देखील पाहिला. अशा संकटांवर मात करु न आपण आता प्रगतीकडे वाटचाल करत आहोत. स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करताना विकासाच्या प्रक्रि येत मागेराहिलेल्या वंचित-मागास बांधवांना सगळ्यांबरोबर संधी मिळावी, यासाठी काम केले जात आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाच्या आर्थिक उन्नतीसाठी शासन,प्रशासन व लोकप्रतिनिधी एकजुटीने काम करून जिल्ह्याचा विकास करू, अशी ग्वाही राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज येथे दिली.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त बीड येथील पोलीस मुख्यालय मैदानावर झालेल्या
मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभानंतर नागरिकांना उद्देशून केलल्या भाषणात त्यांनी ही ग्वाही दिली. यावेळी जिल्हा
परिषद अध्यक्षा शिवकन्या शिरसाट, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषद मुख्य
कार्यकारी अधिकारी अजित पवार, अपर जिल्हा पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार, जिल्हा परिषद सभापती यशोदाबाई
जाधव यांच्यासह प्रमुख मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी आदि निमंत्रित उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, कोरोना काळात अनाथ झालेल्या
जिल्ह्यातील 15 बालकांच्या पालकत्त्वाची जबाबदारी शासनाने स्वीकारली आहे. माता व पिता गमावलेल्या अल्पवयीन
मुलांचे भविष्य घडविण्यासाठी प्रत्येकी एकूण 15 लक्ष रु पये तरतूद करण्यात आली आहे. तसेच, एक पालक गमावलेल्या 927 बालकांनाबालसंगोपन योजनेतून 1100 रुपये दरमहा दिले जात आहेत. कोरोना आपत्तीमध्ये व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत देण्याची प्रक्रि या सुरु आहे. जिल्ह्यातील 1460 कुटुंबांना याचा लाभ देण्यात येत आहे, असे
त्यांनी यावेळी सांगितले.
जनतेला कोरोना संसर्गाच्या छायेतून बाहेर काढण्यासाठी बीड जिल्ह्यात गाव-तांड्यांच्या पातळीपर्यंत लसीकरण
शिबिरे घेण्यात आली, असे स्पष्ट करून पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, बीड जिल्ह्यात पुन्हा सातत्याने पॉझििटव्ह रु ग्णांची
वाढती संख्या लक्षात घेत सगळ्यांनी नियमांचे पालन करु न, मास्कचा वापर करु न,लसीकरण करु न घेऊन साथ द्यावी, असे
आवाहन त्यांनी यावेळी केले. ध्वजारोहण समारंभास अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, उपस्थित मान्यवर व नागरिक यांची भेट घेऊन पालकमंत्री श्री. मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी (बीड) तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत,
उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मिच्छंद्र सुकटे, तहसीलदार सुरेंद्र डोके, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. देशमुख, उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांच्यासह विविध कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत ध्वजारोहण

येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्र माच्या सुरु वातीला संविधानामधील उद्देशिकेचे (सरनामा) सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मिच्छंद्र सुकटे, तहसीलदार सुरेंद्र डोके, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. देशमुख, उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांच्यासह विविध कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.