By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बीड जिल्ह्यात कोरोना मिटर वेगात धावत आहे. मंगळवारी 237 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. आज दुपारी आरोग्य विभागाने जारी केलेल्या रिपोर्टमध्ये गेल्या चोवीस तासांत 2132 संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात 237 नव्या बाधितांची ओळख झाली. तर 1895 जणांचे रिपोर्ट निगेटीव आली आहे.

बीड शहर व ग्रामीण भागात ही मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळून आल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे. शहरातील प्रमुख भागासह ग्रामीण भागात ही बाधित रूग्ण संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने चिंता वाढली आहे.
तालुकानिहाय बाधित रूग्ण
अंबाजोगाई | 59 |
आष्टी | 27 |
बीड | 64 |
धारूर | 01 |
गेवराई | 06 |
केज | 10 |
माजलगाव | 33 |
शिरूर | 03 |
परळी | 21 |
पाटोदा | 09 |
वडवणी | 04 |
एकूण रूग्ण | 237 |