By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बीड जिल्हयात गेल्या तीन दिवसांपासून तीनशेच्या जवळपास कोरोना संक्रमित रूग्ण आढळून येत आहे. रविवारी प्राप्त रिपोर्ट रिपोर्टनुसार 290 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासांत 2144 संशयीत रूग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यात 290 जणांची रिपोर्ट पॉजिटीव्ह तर 1854 जणांची रिपोर्ट निगेटीव आली आहे.
जिल्ह्यात संक्रमणाचा दर 12 च्या जवळपास आहे. तर अॅक्टीव रूग्णांची संख्या ही हजाराच्यापुढे गेली आहे. अजून वेळ गेलेली नाहीं नागरीकांना जागरूक राहून कोविड नियमांचे पालन करून यावर प्रतिबंध लावता येईल.
तालुकानिहाय बाधित रूग्ण
अंबाजोगाई | 88 |
आष्टी | 27 |
बीड | 38 |
धारूर | 05 |
गेवराई | 22 |
केज | 31 |
माजलगाव | 20 |
परळी | 42 |
पाटोदा | 07 |
शिरूर | 04 |
वडवणी | 06 |
एकुण रूग्ण | 290 |