चोवीस तासांत 2414 संशयीत रूग्णांची तपासणी, जिल्ह्यात 64 रूग्णांची कोरोनावर मात
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बीड जिल्हयात कोरोना बाधित रूग्णांचा आकडा वाढतच आहे. शनिवारी कोरोना बाधित रूग्णांची संख्या थेट 307 वर जाऊन पोहचली. संशयीत रूग्णांचा आकडा ही मोठ्या प्रमाणात वाढत असून दररोज अडीच हजारावर जणांची तपासणी केली जात आहे.

गेल्या चोवीस तासांत 2414 संशयीत रूग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यात तब्बल 307 नव्या बाधितांची ओळख झाली. तर 2107 जणांची रिपोर्ट निगेटीव आल्याने त्यांनी सुटकेचा नि:स्वास सोडला.
शनिवारी जिल्ह्यात संक्रमणाचा दर 12.80 वर जाऊन पोहचला. यासह अॅक्टीव रूग्णांचा आकडा 1372 एवढा झाला. तर मृत्यू दर 2.69 एवढा आहे. तर संक्रमित रूग्णांचा आकडा चिंता वाढविणारा आहे. अंबाजोगाई तालुक्यात शनिवारी 81 कोरोना बाधित आढळून आले आहे. शहर व ग्रामीण क्षेत्रात रूग्णांची संख्या अचानक वाढल्याने संक्रमणाचा धोका वाढला आहे. तर जिल्ह्यात 64 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
तालुकानिहाय बाधित रूग्ण
अंबाजोगाई | 81 |
आष्टी | 16 |
बीड | 46 |
धारूर | 08 |
गेवराई | 19 |
केज | 20 |
माजलगाव | 32 |
परळी | 41 |
पाटोदा | 19 |
शिरुर | 08 |
वडवणी | 17 |
एकुण रूग्ण | 307 |