शहरासह ग्रामीण भागात बाधित रूग्णांचा आकडा वाढला
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बीड जिल्हयात कोरोना बाधित रूग्ण संख्या तीनशेच्या घरात जाऊन पोहचली. गुरूवार नंतर शुक्रवारी आलेला आकडा चिंता वाढविणारा आहे. लोकांनी ही याची चांगलीच धास्ती घेतली असून अजूनही अनेक नागरीक कोरोना नियम पायदळी तुडवित असल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे.

मागील तीन दिवसांत शंभर-सवाशे रूग्ण मिळत असतांना गुुरूवारी बाधित रूग्णांचा आकडा 239 वर जाऊन पोहचला तर शुक्रवारी दुपारी आलेल्या ताज्या रिपोर्टनुसार बाधित रूग्णांचा आकडा तब्बल 295 एवढा आला. हा आकडा जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाची ही चिंता वाढविणारा आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या रिपोर्टमध्ये गेल्या चोवीस तासांत 2381 संशयीत रूग्णांची कोराना चाचणी करण्यात आली. यात तब्बल 295 नव्या बाधितांची ओळख झाली. तर 2086 जणांची रिपोर्ट निगेटीव आली आहे.
बीड तालुक्यात संसर्गाचा धोका !
शुक्रवारी बीड तालुक्यात 113 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले. शहर व ग्रामीण भागात ही मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळून आल्याने समुह संसर्गाचा धोका वाढला आहे. शहरातील मित्रनगर, स्वराज्य नगर, शिवाजीनगर, भाग्यनगर, रामनगर तर ग्रामीण भागात चौसाळा, नागापूर मध्ये बाधित रूग्ण संख्या मोठ्याप्रमाणात आढळून आल्याने चिंता वाढली आहे.
तालुकानिहाय बाधित रूग्ण
अंबाजोगाई | 36 |
आष्टी | 13 |
बीड | 113 |
धारूर | 11 |
गेवराई | 09 |
केज | 20 |
माजलगाव | 18 |
परळी | 59 |
पाटोदा | 03 |
शिरूर | 07 |
वडवणी | 06 |
एकुण रूग्ण | 295 |