By MahaTimes ऑनलाइन – बीड |
जागतिक भूगोल दिनानिमित्त येथील मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात भूगोल विभागाच्या वतीने ऑनलाइन वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘नैसर्गिक आपत्तीचा भूगोल’ (जॉग्राफी ऑफ नॅचरल कलामिटी) या विषयावर आधारित भाषणाचा पाच मिनिटांचा व्हिडिओ क्लिप 24 जानेवारी पर्यंत तयार करून पाठवावा. पारितोषिक वितरण दिनांक 27 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजता ठेवण्यात आला असून वकृत्व स्पर्धेत प्रथम पारितोषिक 700 रुपये, द्वितीय 500 रुपये व तृतीय 300 रुपये देण्यात येणार आहे.
जास्तीत जास्त वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन वकृत्व स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलियास फाजील, भूगोल विभाग प्रमुख डॉ.विष्णू सोनवणे, समन्वयक डॉ. मिर्झा वाजिद बेग व डॉ. सय्यद रफत अली यांनी केले आहे.