आजचा पॉजिटीव्हीटी रेट 10.91 वर जाऊन पोहचला
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बीड जिल्हयात नागरीक थोडे बिनधास्त झाल्याचा परिणाम गुरूवारी कोरोना बाधित रूग्णांची संख्या थेट 239 वर जाऊन पोहचली. मात्र दिलासादायक बातमी ही की रूग्ण बरे होण्याचा प्रमाण 96.44 एवढा आहे. दिवसभरात 63 रूग्णांनी कोरोना वर मात केली.

गेल्या आठवडयापासुन कोरोना चे मिटर सुसाट पळत आहे. दो-तीन दिवसांपूर्वी शंभर सवाशे रूग्ण सापडल्यानंतर गुुरूवारी अचानक कोरोनाचा जणू कांही विस्फोट झाला. गेल्या चोवीस तासांत 2191 संशयीत रूग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यात तब्बल 239 नव्या बाधितांची ओळख झाली. तर 1952 जणांची रिपोर्ट निगेटीव आल्याने त्यांनी सुटकेचा नि:स्वास सोडला.
गुरूवारी जिल्ह्यात संक्रमणाचा दर 10.91 वर जाऊन पोहचला. यासह अॅक्टीव रूग्णांचा आकडा 888 एवढा झाला. तर मृत्यू दर 2.71 एवढा आहे. दूसरीकडे शिक्षणप्रेमींची ओरड पाहता शासनाने शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय पालकांची चिंता वाढविणारा आहे. तालुकानिहाय बाधित रूग्ण खालीलप्रमाणे.
MahaTimes – Corona Update
अंबाजोगाई | 64 |
आष्टी | 20 |
बीड | 57 |
धारूर | 07 |
गेवराई | 12 |
केज | 16 |
माजलगाव | 08 |
परळी | 33 |
पाटोदा | 03 |
शिरूर | 10 |
वडवणी | 09 |
एकूण रूग्ण | 239 |